म्हापसा: म्हापसा पालिकेच्या बाजारपेठ प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच अन्य दोन प्रवेशद्वारे अनधिकृत विक्रेत्यांनी पुन्हा व्यापली आहेत. तिथे विक्री व्यवसाय करण्यास मनाई करणारा ठराव म्हापसा पालिकेने संमत केला असतानाही, असे घडत आहे.
विक्रेत्यांकडून अनधिकृतपणे अतिक्रमणे होतच आहेत. उच्च न्यायालयाचे त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश असतानाही विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत पालिकेने डोळेझाक केली असून हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच ठरतो, असे काही दुकानदारांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात लेखी तक्रारी करूनही पालिकेकडून कारवाई केली जात नाही.
बाजारपेठेतील तसेच रस्त्यालगतचे अडथळे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने वर्ष 1997 मध्ये दिलेल्या आदेशानुसार कित्येक वर्षांपूर्वी म्हापसा पालिकेने त्यासंदर्भात कारवाई केली होती. त्या वेळेच्या पालिका मंडळाने बाजारपेठेत त्रासदायक ठरत असलेल्या ठिकाणांवरील विक्रेत्यांना हटवून त्यांची अन्यत्र व्यवस्था केली. कारण, त्यांच्याच आशीर्वादाने ते बाजारपेठेत नियमबाह्य विक्रीव्यवसाय करीत होते.
शहरातील इतर प्रभागांतील अडगळीत ठिकाणांवरील गाळ्यांपैकी बहुतेक सर्वच गाळ्यांचे स्थलांतर व पुनर्वसन प्रक्रिया करण्यात आली होती. स्थलांतर व पुनर्वसनाची सर्व प्रक्रिया पार पाडूनही आता बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारावर काहीजण बाकडे व टेबले टाकून दररोज व्यवसाय करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.