Goa Panchayat Election: पंचायत निवडणुकीचे ‘बिगूल’

फोंड्यातील मंत्र्यांपुढे पेच: एका पक्षाचे अनेक उमेदवार इच्छुक
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: जून ही तारीख पंचायत निवडणुकीकरिता तात्त्विकदृष्ट्या निश्चित झाल्यामुळे सध्या फोंडा तालुक्यातील पंचायतीत इच्छुक उमेदवारांचे पेव फुटले आहे. जो तो या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फोंडा तालुक्यात 19 पंचायती असून त्यातील अठरा पंचायती या फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघात मोडतात. यंदा इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसत असल्यामुळे यावेळी संघर्षमय निवडणूक होण्याचे चित्र दिसायला लागले आहे.

Panchayat Election
'मडगाव' दुकानांच्या लिलावात घोटाळा

फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघात भाजप आमदार असल्यामुळे या तीनही मतदारसंघातील पंचायतीतून अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत. आपणच मंत्र्यांचे ‘खास आदमी’ असून आपल्यालाच मंत्री पाठिंबा देणार असे स्वप्न अनेक इच्छुक उमेदवार रंगवताना बघायला मिळत आहे. त्यामुळे मंत्र्यांची गोची झाली असून त्यांची ‘टु बी ऑर नॉट टू बी’ अशी अवस्था व्हायला लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com