Mercedes-Benz : ‘मर्सिडीज-बेंझ’साठी गोवा अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण बाजारपेठ: संतोष अय्यर

Mercedes-Benz : देशाच्या तुलनेत गोव्यात अधिक विक्री; इव्ही वाहनांनाही प्रतिसाद
Mercedes-Benz
Mercedes-Benz Dainik Gomantak
Published on
Updated on

Mercedes-Benz :

पणजी, भारतातील अग्रगण्य लक्झरी कारउत्पादक असलेल्या गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वृद्धी होत आहे.

देशात सरासरी वाहनविक्रीत १० टक्के वृद्धी होत असून गोव्यात ३५ टक्के अधिक वाहनांची विक्री होते. मर्सिडीज-बेंझ इंडियासाठी गोवा महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख बाजारपेठ आहे, असे मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ संतोष अय्यर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाहन खरेदी करणाऱ्यांमध्‍ये प्रामुख्याने युवकांचा भरणा अधिक असतो. राज्यातील उद्योजक, डॉक्टर, वकील तसेच इतर पेशातील युवक मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करत आहेत. मर्सिडिज-बेंझ हा भारतातील सर्वाधिक पसंतीचा ऑटोमोबाईल ब्रॅंड आहे. वर्षभरात १७ हजार ४०८ एवढी आतापर्यंतची सर्वाधिक वाहने वर्षभरात विकण्यात आल्याचे अय्‍यर यांनी सांगितले.

२०० कोटी गुंतवणुकीची योजना

मर्सिडिजची भारतात विकली जाणारी ९७ टक्के वाहने ही भारतातच बनविली जातात. डाऊनपेमेंट करून इएमआयवर ही गाडी खरेदी केली जाते. वाहनाच्या देखभालीची (मेंटेनेसची) हमी घेतली जाते. ग्राहकांना सर्वतोपरी साहाय्य केले जाते.

मर्सिडिज-बेंझला देशात ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने नवीन-उत्पादन स्टार्टअप, उत्पादन प्रक्रियेचे संगणकीकृत करण्याच्या उद्देशाने २०० कोटी रूपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ग्राहकांच्या अतुट विश्‍वासामुळे आम्ही हे यश संपादन करू शकल्याचे अय्यर यांनी सांगितले.

Mercedes-Benz
Goa Tourist : दक्षिण गोव्यात पर्यटक घटलेच ; व्यावसायिक चिंतेत

मर्सिडिज-बेंजच्या इव्ही वाहनांना देखील ग्राहकांद्वारे चांगला प्रतिसाद लाभत आहे. एकदा चार्जिंग केल्यावर ही वाहने ६५० किलोमीटर अंतर चालतात.

त्यामुळे चार्जिंगचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. यंदा आम्ही इव्हीमध्ये तीन नव्या कार आणणार आहोत. इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबत इव्ही वाहने देखील विक्री केली जात असून येत्या काळात इलेक्‍ट्रिक वाहनांना मोठे भविष्य आहे.

- संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ (मर्सिडीज-बेंझ इंडिया)-.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com