Goa Tourist : दक्षिण गोव्यात पर्यटक घटलेच ; व्यावसायिक चिंतेत

Goa Tourist : दाबोळीवरील विमाने वळविल्याचा परिणाम; किनाऱ्यावर विदेशी पर्यटक येत नाहीत, तसेच देशी पर्यटकांची रेलचेल कमी झाली असल्याची माहिती येथील किनाऱ्यावरील व्यावसायिकांनी दिली.
Goa Tourist
Goa TouristDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist :

फातोर्डा, राज्यात पर्यटन हंगामाला सुरवात झाली आहे. मात्र दक्षिण गोव्यापेक्षा जास्त पर्यटक उत्तर गोव्यात दाखल होत आहेत.

दाबोळी विमानतळावर उतरविण्यात येत असलेली विमाने मोपा विमानतळावर वळविण्यात आल्याने त्याचा परिणाम दक्षिण गोव्यातील पर्यटनावर दिसून येऊ लागला आहे. दक्षिण गोव्यातील किनारी भागातील व्यावसायिक पर्यटक घटल्याने चिंतेत आहेत.

दक्षिण गोव्यातील रुपेरी वाळूचा कोलवा समुद्र किनारा विश्‍‍वस्तरावर सर्वपरिचित आहे, परंतु पर्यटक घटल्याने या किनाऱ्यावरील व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. या किनाऱ्यावर विदेशी पर्यटक येत नाहीत, तसेच देशी पर्यटकांची रेलचेल कमी झाली असल्याची माहिती येथील किनाऱ्यावरील व्यावसायिकांनी दिली.

याबाबत कोलवा येथील शॅक व्यावसायिक डायगो डिसिल्वा यांना विचारले असता, दाबोळी विमानतळावरील विमाने मोपा विमानतळाच्या दिशेने वळविणे हा आमच्यावर एका प्रकारे अन्याय आहे. काही प्रमाणात देशी पर्यटक दाखल होत असले तरी ते समाधानकारक असे नाहीत, असे ते म्हणाले.

तसेच येथील एका निवासी हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, दरवर्षी इंग्लंडहून दाखल होत असलेल्या पर्यटकांच्या एका गटाने आपल्याशी संपर्क साधून सांगितले की, आपण आणि आपले सहकारी यापुढे उत्तर गोव्यात थांबणार आहोत. पूर्वी तो गट दाबोळी विमानतळावर उतरत होता. आता त्याचे विमान मोपा विमान तळावर उतरविण्यात येत आहे. याचा आम्हाला मोठा फटका बसला आहे असे ते म्‍हणाले.

बाणावली येथील वॉटर स्पोर्ट्स बोट व निवासी हॉटेल व्यावसायिक पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांमध्ये घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दाबोळी विमानतळ कार्यरत असला तरी अनेक देशी तसेच विदेशी मोपा विमानतळावर दाखल होत आहेत.

त्यामुळे दक्षिण गोव्याकडे येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरविली असल्याचे ते म्हणाले. अशाने आर्थिक फटका बसल्याने कामगारांना कामावरून काढून टाकण्याची पाळी आली आहे, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी विदेशातून दक्षिण गोव्यात येणाऱ्या एका पर्यटकाने सांगितले की, आपल्याला घेऊन येणारे विमान मोपावर उतरत आहे,

Goa Tourist
Goa Taxi Driver : वाहतूक विभागाकडून होतेय अडवणूक; बाणावलीतील टॅक्‍सीचालकांचा आरोप

आमचा व्यवसाय कोसळला

दाबोळी विमान तळावर उतरणारी अनेक विमाने मोपा विमानतळावर उतरत असल्‍याने याचा फायदा उत्तर गोव्यातील व्यावसायिकांना होणार आहे. तसेच या शेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील व्यावसायिकांनाही फायदा होणार आहे.

पर्यटकांची सर्वच विमाने मोपा विमानतळावर उतरू लागली तर दक्षिण गोव्‍यात पर्यटक फिरकणार नाहीत, त्‍यामुळे दक्षिणेतील पर्यटक व्‍यवसाय डबघाईस येईल, असे अखिल गोवा शॅक व्यावसायिक क्रूझ कार्दोज यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com