Goa News : गोवा-कर्नाटकातील उद्योजकांत सामंजस्य करार; तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

Goa News : करारानुसार दोन्ही प्रदेशांतील उद्योगांमधील सहकार्य, व्यापार सुलभ करणे, इतर प्रकारच्या व्यावसायिक सहकार्यासाठी समर्थन आणि विकास करतील.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

पणजी, गोवा आणि किनारी कर्नाटकातील उद्योजक सुविधांची देवाणघेवाण आणि व्यवसायवृद्धीसाठी एकत्र येणार आहेत.

एकमेकांच्या प्रदेशात उत्पादीत कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यापासून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. तशा सामंजस्य करारावर मंगळूर येथे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास घेंपे आणि कनारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनंतेश प्रभू यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, समान लक्ष्यासाठी या दोन्ही प्रदेशातील उद्योजक सहकार्य करणार आहेत. व्यापार उदीम आणि उद्योग क्षेत्राला पूरक असे वातावरण या कराराच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व कनारा चेंबर करत असल्याने प्रामुख्याने भटकळ ते मंगळूर या टप्प्यातील उद्योजकांना या कराराचा फायदा होणार आहे.

Goa
Goa Murder Case: पेडा - बाणावली खून प्रकरण; प्रियकर सूरज मायगेरीला 9 दिवसांची पोलिस कोठडी

दोन्ही चेंबर्स परस्पर फायद्यासाठी व्यावसायिक संस्था आणि गोवा आणि दक्षिण कन्नड प्रदेशातील आर्थिक, व्यावसायिक आणि वित्तीय संस्था यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देतील. दोन्ही चेंबर यांच्यातील मजबूत संस्थात्मक व्यापार आणि व्यावसायिक संबंध विकसित करण्याची करारातून सहमती दर्शवली आहे.

करारानुसार दोन्ही प्रदेशांतील उद्योगांमधील सहकार्य, व्यापार सुलभ करणे, इतर प्रकारच्या व्यावसायिक सहकार्यासाठी समर्थन आणि विकास करतील.

विवाद निराकरण केंद्रासाठी सहकार्य

पर्यायी विवाद निराकरण केंद्र स्थापन करण्यासाठी गोवा चेंबरला तांत्रिक कौशल्य आणि सल्लागार सहाय्य देण्यास कनारा चेंबरने करारात सहमती दर्शवली आहे.

यात पायाभूत सुविधा सेटअप, ऑपरेशनल फ्रेमवर्क आणि क्षमता-बांधणी उपक्रमांवर मार्गदर्शन समाविष्ट आहे. कार्यक्षम विवाद निराकरण यंत्रणा वाढवणे आणि भागधारकांत सामंजस्य वाढवणे अशी उद्दिष्टे करारात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com