Goa Dairy: गोवा डेअरीच्या 14 संचालकांचे सदस्यत्व रद्द

Goa Dairy Corruption: सहकार निबंधकांच्या कारवाईने खळबळ
Goa Dairy Corruption
Goa Dairy CorruptionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Dairy Corruption: गोवा डेअरीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणातील संबंधित चौदा संचालकांना त्यांच्या मूळ सहकारी संस्थांच्या प्राथमिक सदस्यत्वावरून हटवण्याचा आदेश सहकार निबंधकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

या चौदाही संचालकांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करावे आणि हे सदस्यत्व रद्द करण्यास चालढकल करणाऱ्या संबंधित सहकारी संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहकार निबंंधकांनी सोमवारी (ता.२८) दिला आहे.

Goa Dairy Corruption
Goa Mapusa Municipality: 131 गाळेधारकांना नोटीस; म्हापसा पालिकेची धडक कारवाई...

संचालकपदावरून अपात्र ठरवलेल्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून येत्या दोन दिवसांत त्यावर सुनावणी होणार असल्याचे समजते.

गोवा डेअरीच्या संचालक मंडळावरून अपात्र ठरवलेल्या संचालकांना त्यांच्या सोसायट्यांच्या प्राथमिक सदस्यत्वापासूनही हटवण्याचे आदेश सहकार निबंधक सीताराम सावळ यांनी दिल्याने आता हे संचालक सहकार चळवळीतून बाहेर फेकले गेल्यातच जमा आहे.

Goa Dairy Corruption
Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी संशयित निजील, निहादचा जामीन फेटाळला

कोसंबे, नाईक यांची चिकाटी!

गोवा डेअरीतील कथित भ्रष्टाचाराचा लढा गोवा डेअरीचे एक वरिष्ठ अधिकारी डॉ. अजित कोसंबे व कुडतरी सोसायटीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी दिला.

त्यामुळेच ही कारवाई होणे शक्य झाले. डॉ. कोसंबे यांना गोवा डेअरीतून निलंबितही करण्यात आले होते. मात्र कोसंबे यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता.

यांचे होणार सदस्यत्व रद्दबातल

१) राजेश फळदेसाई, २) विठोबा देसाई, ३) गुरुदास परब, ४) आत्माराम सहकारी, ५) धनंजय देसाई, ६) माधवराव देसाई, ७) बाबुराव देसाई, ८) विजयकांत गावकर, ९) शिवानंद पेडणेकर, १०) राजेंद्र सावळ, ११) उल्हास सिनारी, १२) अजय देसाई, १३) बाबू कोमरपंत, १४) आसेल्मो फुर्तादो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Teachers role in shaping new generation
Goa Section 39A
Enough Is Enough protest Goa
Goa University hostel mess contract cancelled
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com