Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी संशयित निजील, निहादचा जामीन फेटाळला

Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केलेल्या संशयित निजील राज व निहाद प्रम्बध यां दोघांनी जामिनासाठी केलेला अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळला.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केलेल्या संशयित निजील राज व निहाद प्रम्बध यां दोघांनी जामिनासाठी केलेला अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळला.

खंडपीठाने जामीन फेटाळताना संशयितांविरुद्धच्या खटल्यावरील सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतीत जर खटला पूर्ण झाला नाही तर संशयितांना नव्याने जामिनासाठी अर्ज करण्यास मुभा असेल, असे आदेशात म्हटले आहे.

Goa Drug Case
Goa College of Engineering: रोबोटिक्सचे ज्ञान ही काळाची गरज

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अडीच वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी संशयित निजील राज व निहाद प्रम्बध या दोघांविरुद्ध अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली होती.

त्यांच्याकडून ०.३६ ग्रॅमचे २१ एलएसडी ब्लॉट पेपर्स, ०.१५ ग्रॅमचे ८ ब्लॉट्स पेपर्स, ३३ ग्रॅम मेफेड्रोन तसेच ५.१ ग्रॅम हेरॉईन सापडले होते. याप्रकरणाचा तपास करून एनसीबीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्रामध्ये १३ साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. संशयितांना १३ मार्च २०२१ रोजी अटक केल्यापासून ते कोठडीत आहेत.

Goa Drug Case
Goa Mapusa Municipality: 131 गाळेधारकांना नोटीस; म्हापसा पालिकेची धडक कारवाई...

सुमारे २ वर्षे ५ महिन्यांचा कालावधी झाला आहे. सर्व साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवायची बाकी आहे, त्यामुळे संशयितांना जामीन देण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.

सुनावणीसाठी सहा महिने

संशयितांकडे व्यावसायिक प्रमाणात ड्रग्ज सापडला आहे. ज्या मुद्यावर जामिनासाठी विनंती केली आहे ती कायद्यात बसत नाही. यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयात केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

त्यांना जामीन देणे योग्य होणार नाही, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर खंडपीठाने दोन्ही संशयितांचे जामीन फेटाळले. मात्र, त्यावरील सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com