Goa: सोनसोड्यावरील सद्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय

गोव्यातील (Goa) सोनसोडा कचरा प्रकल्पाला चालना देण्यासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा पुढाकार
Meeting was held at Margao BPS Club in Goa
Meeting was held at Margao BPS Club in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: कित्येक वर्षांपासुन खितपत पडलेल्या सोनसोडा कचरा प्रकल्पाला चालना देण्यासाठी मडगावचे (Margao) आमदार दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व मडगाव नगरपालिका कौन्सिल व प्रदुषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला असुन आज मडगावी बीपीएस क्लबमध्ये घेतलेल्या बैठकीत सोनसोडयावरील सद्या कचऱ्याचे ढीग झाले आहेत त्याची प्रथम विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. (meeting was held to decide on the disposal of the current waste in Sonsodo)

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ज्येष्ठ पर्यावरण अभियंते संजीव जोगळेकर यांनी पावरपॉईंट सादरीकरणाद्वारे सोनसोडाचा प्रश्र्न कसा सोडविता येईल, त्यासाठी काय उपाययोजना केली जाईल या संबंधीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

या वेळी जोगळेकर यांनी आठ कलमी उपाययोजनेची माहिती दिली.

  1. ऑर्गेनिक एक्स्ट्र्युडरची स्थापना करुन तेथील कचरा उचलणे व त्यासाठी नावेली येथील सरकारी कचरा विल्हेवाट प्लांटने मदत करणे.

  2. कचरा सुका व ओला अशा पद्धतीने विभाजन करुन एकत्रित करणे.

  3. सद्याची सोनसोड्यावरील यंत्रांची दुरुस्ती करणे,

  4. फॉर्कलिफ्ट व स्किड स्टीअर लोडर्स आणणे.

  5. तीन एसटीपीओ बायो मेथानेशन प्लांट उभे करणे,

  6. सुका कचरा आच्छादीत करण्यासाठी शेड बांधणे 

  7. सोनसोड्यासाठी जी जागा ताब्यात आहे त्याचे सिमांकन करणे

  8. सोनसोडो कचला विल्हेवाटीसाठी सद्याच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी योग्य व पात्र एजन्सीची नियुक्ती करणे.

Meeting was held at Margao BPS Club in Goa
Goa: धारगळ येथे मलेरियाचे 10 रुग्‍ण!

वरील सर्व उपाययोजनांसाठी भरपुर आर्थिक भार सोसावा लागेल शिवाय सद्या जो कचरा साचला आहे तो तेथुन हलवणे महत्वाचे आहे असे उपस्थितांनी स्पष्ट केल्यावर सद्याचा कचरा विल्हेवाटीसाठी ेएजन्सीची निवड करण्याचे ठरले. 

आमदार दिगंबर कामत यांनी सुचवले की पुढील आठवड्यापर्यंत नगरपालिकेने हा कचरा उचलण्यास इच्छुक असलेल्या एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु करावे. हे काम संजीव जोगळेकर यांच्या सहकार्याने करावे. त्यासाठी ेनगरपालिकेने अभियंता विशाल नाईक याची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

सोनसोडो कचरा प्रश्र्न हा अतीगंभीर असुन त्यात राजकारण आणले जाऊ नये असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. सोनसोडोचा प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिका प्रदुषण नियंत्रण मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करेल असे सरदेसाई यानी सांगितले. ही केवळ जागृती असुन शेवटी नगरपालिका समितीला निर्णय घ्यायचा आहे असेही सरदेसाईनी सांगितले.

Meeting was held at Margao BPS Club in Goa
Goa: 'त्या' स्टॉल धारकांचा गोमेकॉ समोर जमाव

नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की तिनही आमदारांनी सोनसोड्याचा प्रश्र्न एकत्रीत ेयेऊनच सोडवला पाहिजे. नगरपालिकेतील अधिकारी एकमेकावर आरोप-दोषारोप करीत असल्यामुळे हा प्रश्र्न तसाच राहिला असल्याचेही ते म्हणाले.

आजच्या या पावर पॉईंट सादरीकरणाला तिनही आमदारांसह उपनगराध्यक्ष दिपाली सावल, सर्व नगरसेवक, मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस व नगरपालिका अभियंते उपस्थित होते.

फोटो कॅप्शन - सोनसोडा कचरा प्रकल्प संबंधी पावरपॉईंट सादरीकरणानंतर पत्रकारांना माहिती देताना आमदार विजय सरदेसाई. सोबत आमदार दिगंबर कामत, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस व इतर नगरसेवक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com