Margao News: मडगावातील वाहतुकीच्‍या कोंडीवर लवकरच तोडगा!

Margao News: दोन शाळांची सुटण्‍याची वेळ बदलणार
Margao Traffic News
Margao Traffic NewsDainik Gomantak

Margao News: सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर मडगाव पोलिसस्थानक परिसरात जी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, त्यावर तोडगा काढण्यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्‍यात आली.

या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोतवाले, वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, फातिमा व लॉयला हायस्कूलचे मुख्याध्यापक, पालक व अन्‍य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीनंतर बोलताना आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीवर उपाय म्‍हणून फातिमा कॉन्‍व्‍हेंट हायस्कूल दुपारी १.३० वाजता तर लॉयला हायस्कूल १.४५ वाजता सोडण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे. विशेष म्‍हणजे दोन्ही विद्यालयांच्‍या मुख्याध्यापकांनी ही सूचना मान्य केली आहे. शिवाय पालकांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचे आम्‍ही ठरविले आहे.

बैठकीला उपस्‍थित पालक, शिक्षक व पोलिसांच्या सूचनांची आम्‍ही नोंद केली आहे. त्यावर विचारविनिमय करून अंमलबजावणी केली जाईल. आठ दिवसांनंतर पुन्‍हा एकदा परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्‍याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.

Margao Traffic News
Margao Accident : अपघाती मृत्‍यू येऊन ठेपला अवघ्या २८ तासांवर! किलर स्‍टेट

दिगंबर कामत, आमदार

शाळा भरताना आणि सुटताना होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्‍हणून फातिमा कॉन्‍व्‍हेंट हायस्कूल दुपारी १.३० वाजता तर लॉयला हायस्कूल १.४५ वाजता सोडण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे. विशेष म्‍हणजे दोन्ही विद्यालयांच्‍या मुख्याध्यापकांनी ही सूचना मान्य केली आहे.

Margao Traffic News
MLA Digambar Kamat: हाज यात्रेसाठी गोव्यातून थेट विमानसेवा सुरू करू; आमदार दिगंबर कामत

फिरते गाडे रात्री घरी नेण्‍याची सूचना

मडगावातील जुने बसस्थानक व पोलिस मैदानावर पालकांना वाहने ठेवण्याची व्यवस्था करण्याचे बैठकीत ठरविण्‍यात आले. जुन्या बसस्थानकावर खाद्यपदार्थांचे जे फिरते गाडे आहेत, त्‍यांच्‍या मालकांनी संध्याकाळी ६ ते रात्री ११ या वळेतच धंदा करून त्यानंतर आपले गाडे आपल्या घरी न्यावेत. त्यामुळे वाहने पार्क करण्‍यासाठी जागा मिळेल असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com