Smart City: मोन्सेरात ऑन ग्राऊंड; कामाची केली पाहणी

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या सूचना
Smart City
Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Smart City गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली आणि पणजीकरांना हैराण केलेली स्मार्ट सिटीची कामे लवकर पूर्ण केली जातील, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी आज दिली. राजधानी पणजीत सांतिनेज परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना आज महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली.

Smart City
Sudin Dhavalikar: वीजमंत्र्यांनी दिली ई-वाहन धारकांसाठी खुषखबर! राज्यात आता लवकरच होणार...

प्रामुख्याने जीसुडा, सार्वजनिक बांधकाम खाते, मलनिःसारण यांची जी कामे सुरू आहेत, ती मान्सून सुरू होण्यापूर्वी कशी पूर्ण करता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्या आहेत.

पणजी शहरातील सांतिनेज भागात मलनिःसारण आणि कचरा व्यवस्थापनाची कामे डोकेदुखीची बनले असून ही कामे वेळेत पूर्ण न झाल्याने सांडपाणी आणि मलनिःसारणाचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे.

यासाठी हे पाणी एका ठिकाणावरून उचलून ते जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नेण्याचे काम सध्या सुरू आहे.

Smart City
Shripad Naik: लोकसभा निवडणुक निमित्ताने भाजपची मोर्चेबांधणी; श्रीपाद नाईक म्हणाले, काही अशक्य गोष्टी..

सांतिनेज चौकात लिकेज झाल्याने हे काम अर्धवट राहिले होते. ते पुन्हा खोदून या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. येथील पाणी उचलून करंजाळे परिसरात नेण्यात येणार असून तिथे या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा सांतिनेज नाल्यात सोडण्यात येणार आहे.

हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले असून कॅफे बोरकर ते अग्निशमन केंद्र काकोलो मॉल पर्यंतचे हे काम सध्या तातडीने करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

या सर्व भागांना आज महापौर मोन्सेरात यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट देऊन ही कामे तातडीने कशी करता येतील आणि पणजी शहराला या सांडपाण्यापासून कसे वाचवता येईल, याबाबत चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com