Shripad Naik: लोकसभा निवडणुक निमित्ताने भाजपची मोर्चेबांधणी; श्रीपाद नाईक म्हणाले, काही अशक्य गोष्टी..

देशाचा कारभार चालवण्याची तुम्ही पुन्हा एक संधी द्या- नाईक
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP देशभरात भाजपचे विविध उपक्रम सुरू असून आता गोव्यातही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संवाद साधत आहे.

सुर्ला पंचायत क्षेत्रात गावकरवाडा सुर्ला येथे रामा गावकर याच्या घरी उपस्थित राहून त्यांच्याशी चर्चा केली. इतर ही काही कार्यकर्त्यांना भेटले.

यावेळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुभाष फोंडेकर, चंद्रकांत घाडी, जगा गावकर, मंगलदास उसगावकर, रामा गावकर इत्यादी सुर्ल गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा फायदा नेहमी भाजपला झाला आहे.

या दहा वर्षात देशात विकासाच्या बाबतीत गगन भरारी घेतली आहे. त्याच बरोबर देशातील काही अशक्य अशा गोष्टी कायद्याचा वापर करू शक्य केल्या आहे. आता या पुढे ही जाऊन आम्हांला कार्य करायचे आहे.

Shripad Naik
Sudin Dhavalikar: वीजमंत्र्यांनी दिली ई-वाहन धारकांसाठी खुषखबर! राज्यात आता लवकरच होणार...

त्यासाठी तुमचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम चालले आहे. याला अधिक बळ प्राप्त होण्यासाठी 2024 ला तुमचे सहकार्य हवे.

देशाचा कारभार चालवण्याची तुम्ही पुन्हा एक संधी द्या, असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोपाळ सुर्लकर यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com