Margao Municipality: 'काम जमत नसेल तर केबीनला ठोकणार टाळे' मडगाव नगराध्‍यक्षांची मुख्‍याधिकाऱ्यांना तंबी

Margao Municipal Council: मडगावचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आज तंबी दिली असून, त्यांनी नगरपालिका प्रशासनात राजकारण न करता सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे वागावे, असा दम पत्रकार परिषदेद्वारे दिला.
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council: मडगावचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आज तंबी दिली असून, त्यांनी नगरपालिका प्रशासनात राजकारण न करता सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे वागावे, असा दम पत्रकार परिषदेद्वारे दिला.

Margao Municipality
Goa BJP: वास्‍को, मुरगावात विजयोत्‍सव; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पालिकेचे प्रशासन योग्य प्रकारे, शिस्तीने चालत नाही. त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे सोनसडो कचरा प्रकल्पात जो घोळ झाला, त्यालाही मुख्याधिकारी कारणीभूत असल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

त्याप्रश्‍नी आमदार दिगंबर कामत यांच्याकडे तक्रार केली असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

सोनसडो कचरा प्रकल्पात खास ज्युनियर इंजिनियर, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक आणि 30 मजूर असतानाही मुख्याधिकारी त्यांच्याकडून काम करून घेत नसल्याचा ठपका शिरोडकर यांनी ठेवला.

सुंदोपसुंदी सुरू

जर मुख्याधिकाऱ्यांना काम करण्याची पद्धत माहीत नसेल तर उद्यापासून त्यांच्या केबीनला टाळे ठोकून त्यांना माझ्या केबीनमध्ये बसवून काम करायला भाग पाडू, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यांनी नगराध्यक्षांच्या सल्ल्यानुसार आणि सूचनांनुसार वागावे.

हिरोगिरी करू नये. त्यांच्या अनेक भानगडी असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे आहेत, असेही नगराध्यक्ष शिरोडकर त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Navelim madrasa fraud allegations
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Digambar Kamat
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com