Mayem Vayangani Gramsabha मद्यालय आणि रस्त्याच्या विषयावरुन मये-वायंगिणी पंचायतीची आजची (रविवारी) ग्रामसभा चांगलीच तापली. आजच्या बैठकीत सेझा कामगार प्रश्न आदी विषयावरुन गोंधळ होण्याची शक्यता गृहीत धरून ग्रामसभेवेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र ग्रामसभा सुरळीत पार पडली.
सरपंच सुवर्णा चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची ग्रामसभा घेण्यात आली. त्यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव प्रणय गावडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले.
आजच्या ग्रामसभेस उपसरपंच सुफला चोपडेकर, सीमा आरोंदेकर, विद्यानंद कारबोटकर, दिलीप शेट, कृष्णा चोडणकर, कनिवी कवठणकर, विशांत पेडणेकर हे पंचसदस्य उपस्थित होते. या ग्रामसभेस जवळपास 100 नागरिक उपस्थित होते.
सेझा कामगारांचा प्रश्न
गेल्या दोन ग्रामसभांप्रमाणे आजही सेझा कामगारांचा प्रश्न चर्चेत आला. मात्र मागील ग्रामसभांप्रमाणे आजच्या ग्रामसभेत या प्रश्नावरुन आक्रमकता दिसून आली नाही.
पंचायतीने संबंधीत खाणीला ‘एनओसी’ देण्यापूर्वी गावच्या आणि कामगारांच्या हिताचा विचार करावा, अशी सूचना कामगारांचे प्रतिनिधी नीलेश कारबोटकर आणि नागेश नाईक यांनी केली.
सरपंचांकडून आरोपाचे खंडन
ग्रामसभेच्या सुरवातीस देवूस-भटवाडी येथील एका खासगी मालमत्तेतील रस्त्याचा विषय अशोक लाड आणि इतरांनी उपस्थित केला. मात्र सरपंच सुवर्णा चोडणकर यांनी रस्ता प्रकरणी केलेल्या आरोपांचे खंडन केले.
याप्रकरणी योग्य तोडग्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून लोकांना शांत केले. एका मद्यालयाला दिलेल्या परवान्यावरूनही गरमागरम चर्चा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.