Honda Gramsabha: कचरा टाकणाऱ्यांवर होंडा पंचायत ठेवणार 'नजर'; ग्रामसभेने घेतलाय 'हा' निर्णय

कचरा टाकणाऱ्यांनो सावधान : कचऱ्यामुळे परिसर होतोय विद्रुप
Gramsabha
Gramsabha
Published on
Updated on

Honda Gramsabha होंडा पंचायत क्षेत्रातील बऱ्याच ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने सर्व परिसर विद्रुप होतो. तसेच दुर्गंधी पसरते. पंचायतीने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असा ठराव रविवारी ग्रामसभेत घेण्यात आला. होंडा परिसरात सोलर कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभा सरपंच शिवदास माडकर यांच्या नेतृत्वाखाली झाली.

ग्रामसभेत उपसरपंच रेशम गावकर, पंच स्मिता मोटे, निलिमा शेट्ये, सिया बोडके, दीपक गावकर, कृष्णा गावकर, निलेश सातार्डेकर, प्रमोद गावडे, पंचायत सचिव मुला वरक तसेच गटविकास कार्यालयातून निरीक्षक म्हणून संचिता राणे उपस्थित होते.

Gramsabha
समुद्रात पोहण्याचा मोह महागात, गोव्यात सहा वर्षात 118 पर्यटकांचा बुडून मृत्यू

यावेळी सरपंच माडकर यांनी स्वागत केले. पंचायत सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला व जमा खर्च सादर करून मंजूर केला.

पंचायत क्षेत्रांत काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने त्या परिसरात अस्वच्छता पसरली असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याचप्रमाणे येथीलल पेपर मिल कंपनीमधून प्रदुषित पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे भिमराव राणे यांनी निदर्शनात आणले. भैरू झोरे यांनी कचराप्रश्‍नीजागृती गरजेची असल्याचे मत मांडले.

Gramsabha
Goa Monsoon 2023: आडपई, कासवाड्यात अद्यापही पडझड सुरूच, सत्तरीत लाखोंची हानी

सर्वेक्षण करणार

सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले की, उघड्यावर कचरा टाकला जात असलेल्या ठिकाणी निर्बंध घालण्यात येणार असून, त्यासाठी सदर भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ठिकाणी सोलर कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे पेपर मिल कंपनीविरोधात लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी, अशी सूचना केली. शेवटी उपसरपंच रेशम गावकर यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com