मयेतील शेतकरी आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

प्रलंबित नुकसान भरपाई मिळेपर्यंत लढ्याचा निर्धार
Mayem Farmer Protest against mining Transport
Mayem Farmer Protest against mining TransportDainik Gomantak

डिचोली : खाण कंपन्यांकडून प्रलंबित नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघर्ष करणारे मयेतील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अगोदर आमची नुकसान भरपाई द्या, नंतरच खनिज वाहतुकीचा विचार करा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शुक्रवारी पैरातील चौगुले खाणीवरून होणारी ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक मये येथे रोखली. अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यंत वाटाघाटी चालू होत्या. तोपर्यंत खनिज वाहतूक बंद होती. (Mayem Farmer Protest News Updates)

Mayem Farmer Protest against mining Transport
वाडी-कांदोळी येथील समुद्र किनाऱ्यालगतच्या शेकडो लिंगुडांच्या झाडांना तोडले

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत खनिज वाहतूक करण्यास देणार नाही. असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने देऊन गेल्या 22 फेब्रूवारी रोजी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले होते. तेव्हापासून खनिज वाहतूक बंद होती. कालपासून (गुरुवारी) पैरा येथील चौगुले खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरु झाली. त्यामुळे आधीच अस्वस्थ बनलेले शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वाखाली या शेतकऱ्यांनी (Farmers) मये पंचायतीसमोरील जंक्शनजवळ खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. या आंदोलनात किसान सभेच्या नेत्यांसह 50 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. थकीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेमार्फत डिचोलीच्या मामलेदारांकडे खटला चालू आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेकडून देण्यात आली आहे. नुकसान भरपाई सोडाच उलट आमच्या वाट्याला धूळ आली आहे, असा आरोप करत नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आंदोलक (Protest) शेतकऱ्यांनी दिला आहे.

Mayem Farmer Protest against mining Transport
युक्रेनमध्ये अडकलेले आणखी तीन गोमंतकीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी

चौगुले आणि वेदांता कंपनीकडून मयेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित खाण (Mining) कंपनींकडून गेल्या सहा वर्षांपासूनची (2014 ते 2019) नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी किसान सभेच्या बॅनरखाली मयेतील शेतकरी संघर्ष करीत आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर रोजी डिचोलीत भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून पैरा येथील चौगुलेच्या खाणीवरून ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरु आहे. यामुळे अस्वस्थ बनलेले शेतकरी नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पुन्हा एकत्रित आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com