VIDEO: मयेत ‘माल्याची’ जत्रा साजरी, देवीचा ‘पण’ही पूर्ण; दोन्ही ‘पेठां’तील देवतांचे भाविकांनी घेतले दर्शन

Malyachi Jatra Mayem: तमाम भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्याची’ जत्रा उत्साहात साजरी झाली.
Malyachi Jatra Mayem
Malyachi Jatra MayemDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: तमाम भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील माया केळबाई पंचायतन देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्याची’ जत्रा उत्साहात साजरी झाली; परंतु या जत्रोत्सवाला वादाचे गालबोट लागले. मध्यरात्री मुळगावची पेठ माघारी जात असताना ‘मोडा’च्या विषयावरून मये व मुळगावच्या गटांमध्ये वादावादी होऊन एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा वाद टळला.

पहाटे जत्रेचे वैशिष्ट्य असलेले ‘माले’ पेटले आणि ‘माले’ डोक्यावर घेऊन नृत्य करण्याचा देवीचा ‘पण’ही पूर्ण झाला. गुरुवारी सुरू झालेल्या या जत्रेची शुक्रवारी पहाटे सांगता झाली.

मुळगाव येथून देवीची पेठ मयेतील केळबाई मंदिरात आल्यानंतर पारंपरिक विधी झाल्यावर दोन्ही पेठ सोबतच चव्हाटा येथे नेण्याची परंपरा आहे. परंतु यावेळी मुळगावची पेठ मंदिराच्या प्रवेशद्वारावरूनच परस्पर चव्हाटा येथे गेली.

त्यानंतर मयेतील नाईक गटातील लोकांनी अवसारी मोडकडून कौल घेतला व सायंकाळी केळबाईची पेठ चव्हाटा येथे नेऊन स्थानापन्न केली. चव्हाटास्थानी असलेल्या दोन्ही ‘पेठां’तील देवतांचे भाविकांनी दर्शन घेतले.

परंपरेप्रमाणे मध्यरात्री मुळगावचे धोंड मयेत दाखल झाले. पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर मुळगावची पेठ मार्गस्थ झाली. त्यानंतर केळबाईची पेठ मंदिरात नेण्यात आली.

Malyachi Jatra Mayem
Malyachi Jatra 2026: मयेत ‘माल्याची’ जत्रा होणारच! मुळगावसह देवीची पेठ पारंपरिक ठिकाणी स्थानापन्न

चोख सुरक्षा व्यवस्था

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डिचोलीचे मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. आदी उपस्थित होते.

Malyachi Jatra Mayem
Zambaulim Gulalotsav: ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय'! जांबावलीचा वैभवशाली गुलालोत्सव

‘माले’ नृत्याचा थरार

परंपरेप्रमाणे वाजतगाजत चव्हाट्यावर आणलेले ‘माले’ पहाटे प्रज्वलित करून मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर पेरणीगीतासह अवसारासह ‘माले’ नृत्याचा थरार सुरू झाला. पेटते ‘माले’ डोक्यावर घेऊन नृत्य करण्याचा देवीचा ‘पण’ पूर्ण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com