डिचोली: समस्त भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला आजपासून (ता.7) प्रारंभ होत आहे.
मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून वादात अडकलेला कळसोत्सव यंदा निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याकडे तमाम भक्तगणांचे लक्ष लागून राहिले असले, तरी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही न्यायालयाच्या आदेशानुसार कळसोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
डिचोलीचे मामलेदार कुट्टीकर यांनी स्पष्ट केले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवता कामा नये. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे यंदाही कळसोत्सव काळात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
उद्या (सोमवारी) सायंकाळी श्री महामाया देवीच्या मंदिरात पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर श्री देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्यात येणार आहे. नंतर अवसारी मोडासहित देवीचा कळस श्री केळबाय मंदिरात नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी पूजाअर्चा आदी पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन होणार आहे. दुसऱ्या दिवसांपासून घरोघरी कलश फिरल्यानंतर मंगळवारी (ता.15) कलशाचे श्री महामाया मंदिरात आगमन होणार आहे. त्याठिकाणी कौलोत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.