Goa Traffic Police: गोव्यात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, नियमभंग केल्यास आता थेट मोबाईलवर चलन

तिसवाडी, बार्देशात 13 जागी वाहतूक नियमन
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Police to Get Stricter for Rule Violators: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लवकरच वाहनचालकांना चलन थेट हातात मिळणार आहे. एक वेळ पोलिसांची नजर वाहनचालकांवर नसेल; परंतु कॅमेरे त्यांच्यावर 12 महिने, 24 तास पाळत ठेवणार आहेत.

त्यामुळे यापुढे वाहतूक नियमांचे पालन करणे वाहनचालकांना अनिवार्य ठरणार आहे. तिसवाडी आणि बार्देश तालुक्यातील 13 ठिकाणी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे वाहतूक नियम तोडणाऱ्यांना थेट मोबाईल क्रमांकावर ई-चलन पाठवण्यात येणार आहे.

राज्यात या महिन्यापासून वाहतुकीच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमप्रणालीचा (आयटीएमएस) वापर केला जाणार आहे. आयटीएमएस प्रणालीवर नोंदवलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविषयीच्या माहितीवरून थेट ऑनलाईन चलन वाहनचालकांच्या घरी पोहोचणार आहे.

मे च्या २२ तारखेला मध्यरात्रीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे परिवहन संचलनालयाने कळवले आहे. मोटार वाहन कायदा 1988च्या भाग 136 -अ अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.

Goa Traffic Police
ED चा 2 खाण कंपन्यांना दणका; 'एवढ्या' कोटींची मालमत्ता केली जप्त

मेरशी जंक्शन येथे आर्टिफिशियल इंटिग्रेटेड वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली राज्य प्राधिकरणांना सुरक्षा, सिग्नल व्यवस्थापन आणि दंड आणि तिकिटे (चलन) जारी करण्यात मदत करेल. हे तंत्रज्ञान स्वतःहूनच वाहतुकीचे उल्लंघन शोधते आणि उल्लंघनकर्त्याच्या पत्त्यावर ई-चलन पाठवते.

Goa Traffic Police
Ponda-Sanquelim Municipal Election 2023: साखळी-फोंडा नगरपालिकांच्या 23 प्रभागांसाठी आज मतदान

आयटीएमएसमध्ये एआय आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा वापर वाहतूक उल्लंघन ओळखण्यासाठी केला जातो. शहरातील ३० ट्रॅफिक जंक्शनवर हे तंत्रज्ञान बसविले जाणार आहे.

येथे असेल यंत्रणा

  • दिवजा सर्कल,

  • कस्टम हाऊस जंक्शन,

  • फेरीबोट जंक्शन,

  • कला अकादमी जंक्शन,

  • सायन्स सेंटर मिरामार,

  • सेंट मायकल स्कूल ताळगाव रोड

  • गोवा विद्यापीठ दोना पावल रोड,

  • मेरशी जंक्शन

(बार्देश तालुक्यातील चार ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com