फोंड्यात मासळी मार्केटसाठी मास्टरप्लॅन

पालिका बैठकीत ठराव: शास्त्री इमारतीसह गोल्डन ज्युबिली इमारत प्रकल्पांनाही देणार चालना
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यात वरचा बाजार भागात असलेले मासळी मार्केट पाडून त्याजागी नवीन मासळी मार्केट उभारण्याबरोबरच लगतच्या भागाचा सर्वंकष विकास करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा ठराव फोंडा पालिकेत सोमवारी झालेल्या खास बैठकीत घेण्यात आला. पालिकेतील सर्व नगरसेवकांनी या मास्टरप्लॅनला संमती दिली आहे.

फोंड्यात अद्ययावत सुविधांनी युक्त मासळी मार्केट संकूल उभारण्याबरोबरच फोंडा पोलिस स्थानकाच्या मागच्या बाजूला असलेल्या शास्त्री इमारतीच्या बांधकामाबरोबरच गोल्डन ज्युबिली प्रकल्प इमारतीच्या कामालाही चालना देण्याबाबतचे महत्त्वाचे ठराव फोंडा पालिकेच्या बैठकीत घेण्यात आले. यासंबंधीची माहिती फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Ponda Municipality
कासारवर्णे-बैलपार येथे 1 मे रोजी ‘जल-आंदोलन’

फोंड्यातील बुधवारपेठ मार्केटमध्ये असलेले मासळी मार्केट अतिशय जुने झाले असून या ठिकाणी मासे विक्रेत्यांना व्यवस्थित बसायला जागाच नाही. त्यामुळे नवीन मासळी मार्केट संकूल उभारण्याबरोबरच चिकन, मटण स्टॉलना जागा देणे व इतर किरकोळ विक्रेत्यांना जागा देऊन त्यांचे पूनर्वसन करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. हे काम ‘जीसुडा’ या साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात येत आहे. जीसुडा तसेच पालिका प्रशासन संचालकांनीही या योजनेला हिरवा कंदील दर्शवला असून शक्य तेवढ्या हे काम हाती घेण्याचे यावेळी पालिका बैठकीत ठरवण्यात आले.

Ponda Municipality
वाडे तळ्यातील पाणी दूषित होण्‍यास ‘सुडा’ जबाबदार

फोंड्यातील एकदम जुनी असलेली शास्त्री इमारत धोकादायक बनली असून या इमारतीचा वापर चार दुकानदार वगळता इतरांनी बंद केला आहे. सध्या या इमारतीत असलेल्या चारही दुकानदारांना अन्यत्र जागा देण्यात येणार असून शास्त्री इमारतीच्या जागी भव्य इमारत प्रकल्प उभारल्यानंतर त्यांना तेथे जागा देण्यात येईल, सद्यस्थितीत या चारही दुकानदारांनी इतरत्र स्थलांतर करण्यास संमती दिली आहे. याकामी फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी यशस्वी शिष्टाई केली, त्यामुळे गेला बराच काळ भिजत असलेला हा प्रश्‍न सोडवण्यात आला आहे. शक्य तेवढ्या लवकर शास्त्री इमारत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असे रितेश नाईक म्हणाले.

पालिका क्षेत्रातील गोल्डन ज्युबिली प्रकल्प इमारतीचे काम नव्याने सुरू करण्यात येणार आहे. हे कामही जीसुडामार्फत करण्यात येणार आहे. हे काम बराच काळ रखडले होते, मात्र आता त्याला चालना देऊन फोंडा शहर परिसर अद्ययावत सुविधांनी युक्त करण्यासाठी फोंडा पालिका या भागाचे आमदार रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असेल, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com