
पणजी: गोव्यात गाजलेल्या जमीन बळकाव प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्दीकी खान याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ सालच्या फसवणूक प्रकरणात पुण्यातील सहकार नगर पोलिसांनी ही कारवाई केली. मेरशी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खानला पुणे पोलिस ट्रांझिट रिमांडवर घेऊन रवाना झाले.
गुन्हे शाखेच्या कारागृहातून फरार झाल्यानंतर सुलेमान खानला पुन्हा अटक करण्यात गोवा पोलिसांना यश आले होते. अटक करुन न्यायलयात हजर केले असता त्याची कोलवाळ येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. २०१४ साली झालेल्या १.३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सुलेमान खान पुणे पोलिसांना हवा होता. पुणे पोलिसांनी गोव्यात येऊन सुलेमानची ट्रांझिट रिमांड मिळवली आहे.
सुलेमान खान याच्याविरोधात देशभरात एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. यातील गोव्यात ८ गुन्हे नोंद असून, यात जमीन बळकाव प्रकरणाचा समावेश आहे. सुलेमान खान हाच जमीन बळकाव प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. राज्यात गाजलेल्या या प्रकरणा अनेक राजकारणी लोकांचा देखील सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
सुलेमान खान चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता अखेर १२ डिसेंबर २०२४ रोजी त्याला हुबळीतून अटक करण्यात आली होती. यानंतर एकाच दिवसांत त्यांना अमित नाईक या पोलिस कॉन्स्टेबलला हाताशी धरुन गुन्हे शाखेच्या कारागृहातून पळ काढला होता. यानंतर दहा दिवसांनी पोलिसांनी सुलेमानला पुन्हा अटक केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.