Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Goa Highway Traffic: इंदापूर व माणगाव येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहन चालकांना व प्रवाशांना थांबावे लागले.
Mumbai Goa Highway Traffic
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.1) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचा दोन ते तीन तास खोळंबा झाला.

महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि शनिवार - रविवार निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात तसेच गोव्यात फिरण्यासाठी निघाले आहेत. पण, मुंबई गोवा महामार्गाच्या गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. इंदापूर व माणगाव येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहन चालकांना व प्रवाशांना थांबावे लागले.

Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Mumbai Goa Highway Traffic
Goa Police: बलात्कार प्रकरणांचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे!

महामार्गावरुन जाणारे अनेक वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. यामुळे इतर वाहनांना देखील अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडी अधिकच जाटील होते. अनेक वाहने एकमेकांना धडकली. यामुळे वाहनचालकांमध्ये वाद देखील झाला. याशिवाय रखडलेल्या रस्त्याचे काम यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडली.

Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Mumbai Goa Highway Traffic
Bicholim: डिचोली परिसरात दीड हजार भाडेकरूंची पडताळणी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहीम तीव्र

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किमी या पहिल्या टप्प्याचे सुरु झालेले काम तब्बल 16 वर्षापासून रखडले आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद होतो. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिक करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com