Ghoteli: येथील पोर्तुगीजकालीन पूल कोसळला

पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने जीवित हानी टळली
Old bridge at Ghoteli
Old bridge at Ghoteli Dainik Gomantak
Published on
Updated on

आज सत्तरी तालूक्यातील घोटेली क्रमांक 2-केरी येथील पूल कोसळला आहे. हा पूल गेले अनेक महिने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. यामूळे या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हा पूल कोसळल्याने शेतीसाठी होणारी वाहतूक आता थांबणार आहे.

(old bridge at Ghoteli collapsed )

Old bridge at Ghoteli
सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल गोव्यातील चार कर्मचाऱ्यांना सेवा पदके

सविस्तर वृत्त असे की, गोवा मुक्ती आणि 1990 च्या दशकापर्यंत सत्तरीतील केरी ते घोटेली दरम्यान महत्वाचा दुवा बनलेला घोटेली नं. 2 येथील जुना पदपूल आज अखेरीस कोसळला. हा पूल जीर्ण झाला असल्याने तो कोसळला आहे. चोर्ला घाटातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीवर हा पूल उभारला होता.

Old bridge at Ghoteli
पणजीत आज भाजपचा मुक मोर्चा

दरम्यान या पादपुलाला नवा पर्यायी पूल उभारल्याने त्यावरील पादचारी व दुचाकी वाहतूक बंद झाली होती. गेल्या काही वर्षांपासून तर या पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते ही बंद झाले होते. त्यामुळे तो वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. सदर पादपूल एका बाजूने नदीत कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने त्याची कोणतीही हानी झाली नाही.

जुन्या आठवणींना उजाळा

आज सकाळी हा पदपूल कोसळल्याचे निदर्शनास आल्यावर परिसरातील लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. वाळवंटी नदीवर हा पूल पावसाळ्यात दोन्ही भागाचा महत्वाचा दुवा होता. वाळवंटी नदी ही पावसाळ्यात रौद्ररूप धारण करीत वाहत असते. अशा वेळी हा पदपूल इथल्या लोकांच्या दळणवळणाचा महत्वाचा दुवा होता. मधोमध नदीत एकखांबी उंच अशा या पुलाला या परिसरातील आकर्षक होते.

नदीला पाण्याची पातळी वाढल्यावर दोन्ही बाजूचे लोक या पुलावर गर्दी करायचे. तसेच या पुलाच्या खालील पात्रात 'भोवऱ्याची कोंड' हा भलामोठा डोह असल्याचे तेथील पाण्याच्या उसळणाऱ्या लहरी पाहण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी असायची. शेवटी आज हा पूल कोसळल्याने लोकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com