Subhash PhalDessai यांनी केला फाळणी दरम्यानच्या अन्यायाचा निषेध

वास्को येथे पार पडला कार्यक्रम
 Mashal rally at Vasco
Mashal rally at VascoDainik Gomantak

वास्को: समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांनी 1947 च्या स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी, त्याद्वारे आपल्या देशातील लोकांवर अत्याचार, बलात्कार, क्रूरता आणि लैंगिक हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ( Mashal rally at Vasco in presence of Social Welfare Minister Subhash PhalDessai)

 Mashal rally at Vasco
Valpoi: ''नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज''

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत भारताच्या फाळणीचा निषेध करण्यासाठी आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ वास्को येथील लक्ष्मी पेट्रोल पंपावर आयोजित कार्यक्रमादरम्यान ते माध्यमांना संबोधित करत होते.

 Mashal rally at Vasco
Vasco Police: फरार आरोपीला थरारक पाठलाग करत पकडले

देशाच्या फाळणी स्मरण दिनानिमित्त इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप लक्ष्मी पेट्रोलियम वास्को येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी वर्ग तसेच लक्ष्मी पेट्रोल पंपचे मालक व कर्मचारी उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी त्यांनी मंदिर, मशिदी आणि चर्चच्या समिती सदस्यांना त्यांच्या घरांवर आणि धार्मिक वास्तूंवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. लक्ष्मी पेट्रोलियम वास्को येथे भरविण्यात आलेले प्रदर्शन 16 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात भारत देशाचे झालेले फाळणीचे चित्रीकरण तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी दिलेल्या बलिदान याचे चित्रीकरण स्क्रीन वरती दाखवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com