Bicholim Municipal Council: डिचोली पालिका बैठक गाजली; विक्रेत्यांतील वाद तसेच अपघात चर्चेत

Municipal Council Meet: भांडणांवर तातडीने तोडगा काढण्याची डिचोली पालिका बैठकीत नगरसेवकांची मागणी
Municipal Council Meet: भांडणांवर तातडीने तोडगा काढण्याची डिचोली पालिका बैठकीत नगरसेवकांची मागणी
Bicholim Municipal Council Meeting Dainik Gomantak

आठवडी बाजारात विक्रेत्यांत होणारे वाद आणि भांडणे, अलीकडेच लोकार्पण झालेल्या बगलमार्गावर होणारे अपघात आदी मुद्यांवरून डिचोली पालिका बैठक गाजली. विक्रेत्यांतील वादाचा दीपा शिरगावकर यांनी तर बगलमार्ग अपघातप्रवण झाल्याचा मुद्दा रंजना वायंगणकर यांनी मांडला.

मुख्याधिकारी सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२४) पालिका मंडळाची बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी उशिरापर्यंत चालली.

या बैठकीस उपनगराध्यक्ष दीपा पळ, सुखदा तेली, राजाराम परब, रियाज बेग, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, नीलेश टोपले, गुंजन कोरगावकर, तनुजा गावकर, ॲड. अपर्णा फोगेरी,ॲड. रंजना वायंगणकर आणि दीपा शिरगावकर हे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

जलवाहिनी वा केबल टाकण्यासाठी पालिका क्षेत्रात फोडलेले रस्ते पूर्वपदावर आणावेत. ही कामे आमदार निधीतून करण्यासाठी आमदारांशी पत्रव्यवहार करावा,अशी मागणी नगरसेवक सुदन गोवेकर यांनी केली.

अलीकडेच म्हणजे गेल्या ६ जून रोजी लोकार्पण करण्यात आलेला चौपदरी बगलमार्ग अपघातग्रस्त बनला आहे, अशी खंत नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर यांनी व्यक्त केली. तर बगलमार्गावरील काही पथदीप पेटत नाहीत.

ही बाब नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी निदर्शनास आणून दिली. राजाराम गावकर, रियाज बेग, निलेश टोपले, ॲड. अपर्णा फोगेरी, गुंजन कोरगावकर, अनिकेत चणेकर आदी नगरसेवकांनी विविध विषय उपस्थित केले.

Municipal Council Meet: भांडणांवर तातडीने तोडगा काढण्याची डिचोली पालिका बैठकीत नगरसेवकांची मागणी
Bicholim News : डिचोलीत वीज खात्याच्या मालमत्तेची लाखोंची हानी

विक्रेत्यांत वाद; ग्राहकांना मनस्ताप!

डिचोलीच्या आठवडी बाजाराच्या दिवशी जागा आणि अन्य कारणावरून विक्रेत्यांमध्ये वाद आणि भांडणे होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बाजारहाटीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा मुद्दा दीपा शिरगावकर यांनी उपस्थित करून, हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. बाजारातील विक्रेत्यांच्या अंधाधुंदीवर नियंत्रण आणण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी मार्केट निरीक्षकांना निर्देश देण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com