Bicholim News : डिचोलीत वीज खात्याच्या मालमत्तेची लाखोंची हानी

Bicholim News : बहुतेक भागात जलमय स्थिती दिसून येत होती. गेले दोन दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र या पावसामुळे सुखावला आहे.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून गुरुवारी (ता.२०) जोरदार पावसाने सर्वत्र झोडपून काढले. वादळी वारा जोरदार पावसाच्या तडाख्यात डिचोलीतील विविध भागात झाडांची पडझड झाली.

एका घरावर मिळून आठ ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. या पडझडीत वीज खात्याचे मिळून तीन लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, रात्री आठ वाजल्यानंतर पावसाने जोर धरला. ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यवृष्टी सुरू झाली. आजच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बहुतेक भागात जलमय स्थिती दिसून येत होती. गेले दोन दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र या पावसामुळे सुखावला आहे.

दरम्यान, लिडींग फायर फायटर विठ्ठल गावकर, अर्जुन धावस्कर आणि महादेव गावस यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी धाव घेऊन मदतकार्य केले.

Bicholim
Goa Revolution Day 2024: लोहिया मैदान, डॉ. मिनेझिस; गोवा क्रांती दिनानिमित्त आलेमाव यांच्या सरकारकडे दोन मागण्या

संदीप परब आणि कपिल गावस (चालक), संजय उसपकर, रामचंद्र मळीक, आशिष मोर्लेकर, सागर कुंकळेकर, योगेश माईणकर, महेश देसाई आदी जवानांनी मदतकार्यात भाग घेतला.

वाहतूक कोंडीचे प्रकार

पावसाच्या तडाख्यात कुमयामळ-साळ येथे घरावर झाड कोसळले. या घटनेत घराची मोडतोड होऊन आर्थिक नुकसान झाले. देवगी-चोडण येथे कुंपणावर झाड कोसळून कुंपणाची मोडतोड झाली. मेणकुरे आणि धुमासे येथे मिळून दोन झाडे वीजवाहिन्या तोडून रस्त्यावर कोसळली. पैरा येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. कुडचिरे आणि डिचोलीतील आयडीसी रस्त्यावर झाड कोसळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com