राज्यात झेंडूची फुलेही 'बाहेरूनच',स्थानिक फूले मात्र दुर्मिळ

दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिचोली बाजारात कर्नाटकातील लाल-पिवळ्या झेंडू फुलांची प्रचंड आवक झाली आहे.
 Marigold flowers yield decreased in Goa
Marigold flowers yield decreased in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दसरोत्सवाच्या (Dussehra) पार्श्वभूमीवर डिचोली (Bicholim) बाजारात कर्नाटकातील (Karnataka) लाल-पिवळ्या झेंडू फुलांची प्रचंड आवक झाली आहे. तर दुसऱ्या बाजूने बहर लांबल्याने स्थानिक मातीत फुलणारी झेंडू फुलांचा मात्र यंदा तुटवडा जाणवणार आहे. कृषी खात्याचे प्रकल्पही अजून फुलांनी बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा डिचोलीतील जनतेला राज्याबाहेरील फुलांवरच अवलंबून रहावे लागणार आहे. अशीच चिन्हे दिसत आहेत. आज साप्ताहिक बाजाराच्या दिवशी डिचोलीत कर्नाटक राज्यातील राणेबेन्नूर-हुबळी भागातून मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रीस झाली आहेत. उद्यापासून आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतही फूल विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

बाजारात फुलांचा सडा

दसरा सण म्हटला, की झेंडूच्या फुलांना प्रचंड खप असतो. ही मागणी ओळखून गेल्या काही वर्षांपासून राज्याबाहेरील फूल विक्रेत्यांनी डिचोली बाजारपेठेवर वर्चस्व मिळवले आहे. दसरा सण दोन दिवसांवर आल्याने आता डिचोली बाजारात राज्याबाहेरून झेंडू फुलांची आवक सुरु झाली असून, काल तर एकाच दिवशी बाजारात फुलांची मोठी आवक झाली आहे. बाजारातील गणपती पूजन मंडपात तर झेंडू फुलांचा सडा पसरल्याचे जाणवत होते. 100 रुपये प्रति किलो दराने त्यांची विक्री होत आहे. कर्नाटकातील राणेबन्नूर येथून ही फूले उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एक विक्रेते इम्रान यांनी दिली आहे .

स्थानिक मळे बहराविना

कृषी खात्याच्या 'आत्मा' योजनेंतर्गत यंदा डिचोलीत 'झेंडू'ची दुप्पट लागवड करण्यात आली असली, तरी क्वचित अपवाद सोडल्यास अद्याप 'झेंडू'चे मळे फुलांनी बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा दसरा सणात कृषी खात्याच्या डिचोलीतील काही भागातील प्रकल्पातून झेंडूची फूले मिळणे अवघड बनणार आहे. असंतुलित पाऊस आणि झेंडूच्या रोपांच्या लागवडीस उशिर झाल्याने झेंडू फूले बहरण्यावर परिणाम झाला आहे. असा दावा कृषी खात्याने केला आहे.

कृषी खात्याच्या सहकार्याने यंदा बोर्डेसह साळ, नानोडा, पिळगाव, मये आदी भागात मिळून डिचोलीत 25 हजार चौरस मीटर अर्थातच अडीज हेक्टर जमीन झेंडू लागवडीखाली आली आहे. जवळपास 30 शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे. मात्र अजूनही मळ्यांनी झेंडूची फूले नजरेला पडत नाहीत.

गेल्या वर्षी दसरा सणावेळी डिचोलीतील मळे झेंडू फुलांनी पूर्णपणे बहरले होते. यंदा दसऱ्याला झेंडूची फूले दुर्मिळ होणार असली, तरी हवामान संतुलित राहिल्यास दिवाळी सणावेळी झेंडूची फूले उपलब्ध होण्याची आशा आहे. तसे संकेतही कृषी खात्याकडून मिळाले आहेत.

 Marigold flowers yield decreased in Goa
काँग्रेस आता कोणताही धोका पत्करणार नाही: पी. चिदंबरम

लागवडीस उशिर

स्थानिक नर्सरीतून झेंडूची रोपटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. असंतुलित पावसामुळे सुरवातीस झेंडूची तयार रोपे कुजून गेलीत. त्यामुळे पुन्हा रोपे रुजवून काढावी लागली. त्यामुळे लागवडीस जवळपास महिनाभर उशीर झाला. लागवडीस झालेल्या उशिरामुळे फुलांच्या बहरावर परिणाम झाला असून, फुले फुलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अशी माहिती कृषी खात्याकडून मिळाली आहे.

फूलांची अनुपलब्धता

यंदा 'झेंडू'ची रोपटी उशिराने उपलब्ध झाल्याने लागवड जवळपास एक महिना उशिराने झाली आहे. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. गेल्या वर्षी ऐन दसरोत्सवात आपल्या मळ्यातून दिडशेहून अधिक किलो झेंडू फुलांची विक्री करण्यात आली होती. यंदा मात्र दसऱ्याला एक किलोही फूल मिळणे मुश्किल झाले आहे. रोपांना नुकतेच कळे उगवत आहेत.दसऱ्यानंतर मळा फुलांनी बहरण्याची आशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com