पणजी: गोव्यातील रहिवाशी मारिया झिटा कार्व्हालो यांनी 1 एप्रिल रोजी आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला. पोंबुर्पा येथील सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंटमध्ये वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळेस मारिया झिटा कार्व्हालो म्हणाल्या, “आज 1 एप्रिल आहे. मात्र, शाळेत जाण्याची गरज नाही. जो या बातमीवर विश्वास ठेवतो तो सर्वात मोठा मूर्ख आहे!" कार्व्हालो यांनी आयुष्याची शंभरी पार केली आहे. त्यांनी कोरोना काळात हिम्मत हारली नाही. त्यांनी आयुष्यभर सर्व कठीण प्रसंगांचा सामना केला आहे.
मारिया झिटा यांना तीन मोठ्या बहिणी होत्या. त्यातील प्रत्येकीने जगाच्या विविध भागांमध्ये शंभरी पार केली — एक बहीण गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दुसरी ऑक्टोबर 2019 मध्ये आणि सर्वात मोठी एप्रिल 2013 मध्ये 100 वर्षांची झाली होती.
मारिया सारा, मारिया लिडिया आणि मारिया लॅव्हिनिया यांचे निधन झाले आहे. त्यांच्या वंशाच्या दीर्घायुष्याचा पुरावा म्हणून फक्त मारिया झिटा उरल्या आहेत. मारिया झिटा त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ फ्रान्सिस्कन मिशनरीज ऑफ क्राइस्ट द किंग (FMCK) मध्ये सेवा केली आहे. 1979-83 पर्यंत त्या नागपूरच्या मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या
वयाच्या 99 व्या वर्षापर्यंत मारिया झिटा काठीच्या आधारे चालत होत्या. आता त्या फिरण्यासाठी व्हीलचेअर वापरतात. त्यांना या वयात कोणताही गंभीर आजार नाही. भात, मासे (Fish), मांस त्यांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे.
"ती नेहमी देवाची (God) स्तुती आणि आभार मानते. आम्ही तिला नेहमी नेहमी हसत खेळत पहिले आहे. तिला आजही गाणे आवडते. तिला मांजरी आणि कुत्रे देखील खूप आवडतात,” असे त्यांच्या निकटवर्तीय सोलंकी सांगतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.