मडगावात 'हॉटमिक्सिंग'नंतर रस्ते,पदपथ आले समपातळीत

मडगावातील प्रकार: पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना वाढण्याची भीती
Hotmix asphalting
Hotmix asphaltingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगावातील प्रमुख रस्त्यांचे नुकतेच हॉटमिक्सिंग डांबरीकरण करण्यात आले. या डांबरीकरणामुळे विशेषतः नगरपालिका चौकात बाजूच्या पदपथ तसेच पालिका इमारतीचा व्हरांडा समपातळीत आला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नेमके काय होईल, याबाबत चर्चा सुरू झालेली आहे.

या हॉटमिक्सिंग नंतर पालिका उद्यानाभोवतालचे पदपथही रस्त्याशी समपातळीत आले आहेत तर पालिका चौकांतही रस्ते व पदपथ समपातळीत आले आहेत. मडगावातील जुन्या मासळी मार्केटात बाजूच्या इमारतींचे व्हरांडे व रस्ते यांची एकच पातळी झाली आहे.

Hotmix asphalting
अबब! 7 रुपयांना एक लिंबू!

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पाणी तुंबले तर रस्ते व हे व-हांडे किवा पदपथ कोणते हे कळणे कठीण जाणार आहे. गेल्या वर्षी तौक्ते वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसात तसेच नंतरच्या अतिवृष्टीमुळे पालिका चौकांत गुडघाभर पाणी साचले होते व एकदा तर ते व्हरांड्यातही तुंबले होते. तसे आता घडले तर बिकट परिस्थिती उद्‍भवेल, अशी भीती व्यक्त होत आहे.पदपथ व अन्य इमारतींचे व्हरांडे यांच्या समपातळीत रस्ते आल्याने आता वाहने पदपथावर सर्रास पार्क होणार नाहीत ना, व त्यातून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका तर निर्माण होणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

Hotmix asphalting
'रावणफोंडातील सहापदरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच लागेल मार्गी'

दिगंबर कामत यांच्याकडून पहाणी

आमदार दिगंबर कामत यांनी या नव्याने हॉटमिक्स डांबरीकरण केलेल्या रस्त्याची आज सकाळी पहाणी केली. रस्त्याची उंची वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. पालिका अभियंता मनोज पार्सेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक गौतम साळुंखे उपस्थित होते. कामत यांनी यावेळी काही भागात रेलींग उभारण्याच्या सूचना केल्या, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com