Astrology Tips: रागाच्या भरात दुसऱ्यांना बोलणं पडेल महागात...

अनेक लोक रागाच्या भरात जवळच्या लोकांचे मन दुखवतात. तुम्हीही असे केले आहे का?
Astrology Tips
Astrology TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Astrology Tips: अनेकदा रागाच्या भरात आपल्या जवळच्याच लोकांचे मन दुखवतो. आपला राग काही गोष्टीत निघणे हे जरी स्वाभाविक असले किंवा आपल्याला सर्वकाही सुरळीत सुरू असताना एखाद्या गोष्टीचे अकारण भय वाटणे किंवा स्वत:ला दोष देत बसणे किंवा स्वत:बद्दल नेहमी नकारात्मक बोलणे इतरांकडून ऐकत बसणं याचा परिणाम तुमच्या ग्रहांवर होउ शकतो.

इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा आपल्याबद्दल एकसारखे नकारात्मक ऐकणे याने तुमचे चांगले ग्रहही वाट बदलतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला आयुष्यात भोगावा लागतो.

आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कोणत्या गोष्टींचा विचार केल्याने किंवा इतरांना उद्देशुन बोलल्याने कोणते ग्रह प्रभावित होतात.

Astrology Tips
Pregnancy Diet: प्रेग्नेंसीमध्ये कोणती फळ खावीत अन् कोणती नाही, जाणून घ्या एका क्लिकवर
  • सूर्य दोष कधी लागतो

आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतो तेव्हा अशा स्थितीत सूर्य ग्रहाला दोष लागतो आणि आपल्यासोबत सर्व काही चुकीचे घडू लागते. स्वतःबद्दल वारंवार चुकीचे बोलणे आणि स्वतःबद्दल नकारात्मक बोलणे टाळले पाहिजे.

  • माता दुर्गेची पुजा करावी

अनेकदा रागाच्या भरात आपण कोणाचीतरी उतरवुन ठेवतो. कधीतरी इतरांच्या चारित्र्यावर बोलतो. असे आरोप इतरांवर केल्याने आपला शुक्र विपरीत प्रभाव टाकायला लागतो आणि त्यामुळे आपल्याकडील सन्मान, संपत्ती संपुष्टात येते. अशात आपल्या हातून अशा प्रकारची चूक घडली असल्यास माता दुर्गेची क्षमा मागावी आणि दुर्गेची पूजा करावी.

  • बुध दोष कधी लागतो

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक वितार करता तेव्हा तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे. अशात तुम्ही नकारात्मक उर्जेच्या आहारी गेलेले असता आणि तुमची सकारात्मक उर्जा संपपलेली असते. अशात तुमचा बुध नकारात्मक प्रभाव द्यायला लागतो. अशा वेळेस श्री गणेशाचं ध्यान करणं सर्वोत्तम मानलं जाते.

Astrology Tips
Pregnancy Diet: प्रेग्नेंसीमध्ये कोणती फळ खावीत अन् कोणती नाही, जाणून घ्या एका क्लिकवर
  • चंद्र दोष कधी लागतो

सर्वकाही सुरळीत सुरू असते. पण अकारण आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण व्हायला लागतात. भविष्याबद्दल एक अनाठायी भीती आपल्या मनात जागा घेते.

हीच भीती प्रत्यक्ष परिवर्तनात बदलते आणि दुर्देवाची शिकार ही व्यक्ती बनते. अशात चंद्रदोष लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी भगवान शिवाचं ध्यान करावं आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी, आपल्या विचारांवर संयम ठेवावा.

  • गुरुचा दोष कधी लागतो

कळत नकळत जेव्हा तुम्ही एखाद्याचे वाईट करता किंवा एखाद्याबद्दल वाईट ऐकता तेव्हा अशा स्थितीत तुमचा गुरु ग्रह प्रभावित होतो आणि हळूहळू घर, कुटुंब, मित्र आणि समाजातील तुमचा सकारात्मक प्रभाव संपतो. लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात.अशी वेळ टाळण्यासाठी भगवान विष्णूची प्रार्थना करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com