Goa News : राज्याची आर्थिक राजधानी मडगावात निम्म्यांहून अधिक जाहिरात फलक अनधिकृत

बिहारी युवकाचा वीजधक्‍क्‍याने मृत्यू झाल्याने प्रश्‍‍न ऐरणीवर
Illegal Banners
Illegal BannersGomantak Digital Team

राज्याची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगाव शहरात कित्येक व्यापारी आस्थापनांकडून बेकायदा कृत्ये सुरू आहेत. शहरातील व्यावसायिक आस्थापनांचे निम्म्यांहून अधिक जाहिरात फलक अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे.

मडगाव येथील कुडतरकर शॉपिंग संकुलाच्या प्रवेशद्वारानजीक जाहिरात फलकांसाठी नेण्यात आलेल्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने अलीकडेच एका बिहारी युवकाचा मृत्‍यू झाला होता. यासंदर्भात मडगाव पालिकेने आपल्‍या मार्केट निरीक्षकासह तपासणी पथक पाठवून चौकशी केली असता 9 पैकी 7 जाहिरात फलक कोणतीही परवानगी न घेता उभारल्याचे आढळून आले.

Illegal Banners
Vaibhavi Upadhyay Passes Away : 'साराभाई व्हर्सेस साराभाई'च्या जास्मिनने घेतला जगाचा निरोप...अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू

या दुर्घटनेमुळे हा प्रश्‍‍न ऐरणीवर आला असून पालिका आता कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वीज खाते आणि पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात? याकडेही लक्ष लागले आहे. दरम्‍यान, वीजधक्का लावून निष्‍पाप बळी गेलेल्‍या युवकाला न्याय मिळेल का? असा सवाल उपस्‍थित होत आहे.

Illegal Banners
America: 17 वर्षीय मुलीनं केला दोन अल्पवयीन मुलांवर बलात्कार; FIRमध्ये आईचंही नाव

गॅस कटरचा वापर करून फलक हटविणार

मडगाव पालिका मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्ही पाहणी केली असता ९ पैकी ७ जाहिरात फलक बेकायदा असल्याचे आढळून आले. गॅस कटरचा वापर करून ते हटविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Illegal Banners
Astrology Tips: तुमच्याही घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं आहेत?मग ही बातमी तुमच्यासाठीच

दरम्‍यान, सदर प्रकरण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून प्रथमदर्शनी नोंद केले आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना येथील वीज ट्रान्‍सफॉर्मरचा कोणताही फॉल्‍ट नसल्‍याचे आपणास वीज अधिकाऱ्यांनी सांगितल्‍याचे स्‍पष्‍ट केले. वीज खात्याचे अधिकारी आणि पोलिसांना पुढील चौकशी करण्यास सांगितले असल्याचे कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com