Margao Crime: 'चोरी नव्हे, हा तर खुनाचा प्रयत्न'! मडगाव दुर्घटनेवरून प्रभाव नायक आक्रमक; तातडीने कारवाईची केली मागणी

Margao Theft: समाजविघातक घटकांपासून शहर मुक्त करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे, अशी मागणी मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.
Theft News
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: शहरात एका महिलेवर झालेल्या अमानुष हल्ल्याला पोलिस चोरीचा प्रकार म्हणून रंग देत असले, तरी हा हल्ला स्पष्टपणे खुनाचा प्रयत्न आहे आणि तात्काळ ‘खुनाचा प्रयत्न’ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणे अक्षरशः ताब्यात घेऊन दहशत माजवणाऱ्या समाजविघातक घटकांपासून शहर मुक्त करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे, अशी मागणी मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.

मडगावकर आता केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही असुरक्षित झाले असून महिला व ज्येष्ठ नागरिक भयभीत अवस्थेत जगत आहेत. ही वाढती असुरक्षितता म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा संपूर्ण ऱ्हास आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात शासनाचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षांपासून मडगावातील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत आपण सातत्याने आवाज उठवत असून, वेळेत उपाय न केल्यास अशा गंभीर घटना घडणारच, असा इशारा दिला होता, असे प्रभव नायक यांनी सांगितले. मात्र, वारंवार सूचना देऊनही सरकार पूर्णपणे असंवेदनशील व उदासीन राहिले, असा आरोप त्यांनी केला.

Theft News
Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

पीडित महिलेच्या घरी भेट दिल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी भीतीपोटी ती दुसऱ्या नातेवाइकांकडे राहायला गेल्याची माहिती दिली. गुन्हेगार मोकाट फिरत असताना पीडितांना आपले घर सोडावे लागणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. त्यांनी पीडितेच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

Theft News
Amritsar Margao Train: प्रवाशांसाठी खुशखबर! गोव्यासाठी धावणार खास ट्रेन; मडगाव-अमृतसर आरक्षित एक्स्प्रेस रेल्वे सुरू

आमदार मौन का...?

या गंभीर घटनेवर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अद्याप मौन बाळगले असून, हे मौन अत्यंत निषेधार्ह असल्याचे प्रभव नायक म्हणाले. मडगावच्या आमदाराने साधे निषेधाचे विधानही न करणे म्हणजे मडगावकरांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण उदासीनता दर्शवते, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com