Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Margao News : सध्‍या दक्षिण गोव्‍यातील किनारपट्टी भागात असा प्रचार सुरू झाला असून हे पॅरा ग्‍लायडर्स आकाशातून पत्रके फेकत आहेत. ज्‍यावर मतदानाचा हक्‍क लोकांनी बजावावा, असा संदेश लिहिलेला असतो.
Margao
Margao Dainik Gomantak

Margao News :

मडगाव, ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्‍या मतदानाला मतदारांनी मोठ्या संख्‍येने बाहेर येऊन मतदान करावे यासाठी दक्षिण गोव्‍यात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले असून त्‍याचाच एक भाग म्‍हणून पॅरा मोटर ग्‍लायडर्सचा वापर करुन मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार आहे.

सध्‍या दक्षिण गोव्‍यातील किनारपट्टी भागात असा प्रचार सुरू झाला असून हे पॅरा ग्‍लायडर्स आकाशातून पत्रके फेकत आहेत. ज्‍यावर मतदानाचा हक्‍क लोकांनी बजावावा, असा संदेश लिहिलेला असतो.

दक्षिण गोव्‍याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी आश्‍वीन चंद्रू यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे यापूर्वी अन्‍य भागातही प्रचार करण्‍यात आला होता. त्‍याच एजन्‍सीला आम्‍ही चार दिवसांसाठी दक्षिण गोव्‍यात प्रचार करण्‍यासाठी नेमले आहे.

Margao
Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

हवेतून टाकणार पत्रके

हे पॅरा ग्‍लायडर्स आकाशातून लोकवस्‍तीत पत्रके टाकणार आहेत. ज्‍यातून मतदारांनी कुठल्‍याही दबावाखाली न येता स्‍वेच्‍छेने मतदान करावे असा संदेश लिहिलेला आहे, असे त्‍यांनी सांगितले.

याच मोहिमेचा एक भाग म्‍हणून मतदानाच्‍या दिवशी जिल्‍हा प्रशासनातर्फे वेगवेगळीकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाईल. वेगवेगळ्‍या मार्गानी लोकांना मतदानासाठी आकर्षित करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल, असे चंद्रू यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com