Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Goa Today's 01 May 2024 Live News Update: गोव्यात विविध क्षेत्रात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा.
North Goa
North Goa

जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांचे चिंबलमध्ये फ्लॅग मार्च

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांचे चिंबल येथे फ्लॅग मार्च

मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मद्यविक्रीस बंदी

Ban On Liquor Sale In Goa

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 5 मे संध्याकाळी 6 पासून 7 मे मध्यरात्रीपर्यंत तसेच, मतमोजणीच्या दिवशी (4 जून) मद्यविक्रीस बंदी. मतदान केंद्राच्या 100 मीटर आवारातील हॅाटेल्स इतर खाद्यपदार्थांची दुकानेही राहणार बंद. 200 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश.

कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Taleigao VP Election

नुकत्याच पार पडलेल्या ताळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री बाबूश यांचे पॅनल सर्व जागांवर विजयी झाले आहे. आता ताळगावचा सरपंच आणि उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली असून, यासाठी येत्या सहा मे रोजी निवडणूक होणार आहे.

मंत्री बाबूश यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे यावेळी या पदांसाठी नेव चेहरे दिले जाणार आहेत.

शापूर फोंडा येथे दुचाकींचा अपघात, दोघे जखमी

Goa Accident

शापूर फोंडा येथे दोन दोन दुचाकींचा झालेल्या अपघातात जमाल तिगडी (वय ४२) आणि तर दुसऱ्या दुचाकी चालक संतोष जखमी. जमाल यांचा पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी गोमेकॉत दाखल. तर, अपघातास कारणीभूत ठरलेल्या संतोषला उपचारानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात.

ओल्ड गोवा येथे कारचा अपघात

Old Goa Accident

ओल्ड गोवा येथे चालकाचा कारवरील ताबा गेल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Vishwajit Rane

मी मनापासून भाजपची विचारधारा स्वीकारली आहे. फक्त भाजपच नाही तर संघाचे कामही मनापासून करतोय. संघाची विचारधारा घेऊन मी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

नद्यांचे संवर्धन, कायदेशीर मायनिंग आणि अन्य ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - खलप

Ramakant Khalap

नद्यांचे संवर्धन, कायदेशीर मायनिंग आणि अन्य ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- काँग्रेसचे ऍड. रमाकांत खलप यांची ग्वाही. डिचोलीच्या आठवडी बाजारात प्रचार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरवात.

कॉंग्रेसमध्ये असतानाही माझ्या वडिलांचा श्रीपाद नाईकांनाच पाठिंबा!

Vishwajit Rane

श्रीपाद नाईक आणि माझे वडील प्रतापसिंह राणेंच वेगळं नातं.कॉंग्रेमध्ये असतानाही माझ्या वडीलांनी लोकांना श्रीपाद नाईकांना मत देण्यास सांगितलं होतं.आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Goa Cyber Crime

मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी करुन विनयभंग केल्याप्रकरणी अनोळखी इंस्टाग्राम आयडीविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चिंबल येथील मुलीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवरुन फर्स्ट अबू धाबी बँकेत नोकरीचे आमिष देऊन मुलीची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान, त्याने असा प्रकार करुन तिला ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com