Margao News: ...तर सोपो कर देणार नाही - मच्छिमारांचा इशारा; बैठकीला SGPDA सदस्य गैरहजर

मडगाव पालिकेत मच्छिमार, मासे विक्रेते, प्रशासनाची बैठक
Margao News:
Margao News:Dainik Gomantak

Margao SGPDA Meeting News: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज, शुक्रवारी मडगाव पालिकेत मच्छिमार, घाऊन मासे विक्रेते संघटना, SGPDA, उपजिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी मच्छिमारांनी SGPDA ने नियुक्त केलेली व्यक्ती खंडणी मागत असल्याचा आरोप केला. तसेच सोपो कर न देण्याचा इशारा दिला.

पालिकेचे चीफ ऑफिसर गौरीश सांखवाळकर म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैठक घेतली आहे. मासे विक्रेते आणि मच्छिमार यांना हायकोर्टाने दिलेले दिशानिर्देश पालन करण्याबाबत सांगितले आहे.

Margao News:
National Games 2023 वर राज्याने खर्च केले 450 कोटी रूपये; गेल्या 15 दिवसांत घेतले 300 कोटीचे कर्ज...

या वेळी मच्छिमारांनी SGPDA ने अनधिकृत नियुक्ती केलेल्या सुभाषने खंडणी मागितल्याचा आरोप केला. तसेच सोपो कर देऊनही मार्केट स्वच्छ ठेवता येत नाही, अशी तक्रार केली. जर तुम्हाला मार्केट स्वच्छ ठेवता येत नसेल तर आम्ही जबाबदारी घेऊ.

आम्ही मार्केट स्वच्छ ठेऊ पण मग आम्ही सोपो कर भरणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

विशेष म्हणजे या बैठकीला SGPDA चे सेक्रेटरी, सदस्य उपस्थित नव्हते. SGPDA कडे या मार्केटचे पूर्ण नियंत्रण असतानाही त्यांची या बैठकीला अनुपस्थिती असल्याने या विषयाची चर्चा सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com