Margao Samart Club: तंत्रज्ञानामुळे सर्जनशीलतेचा लोप

मायकल फर्न्स : मडगाव सम्राट क्लबच्‍या उन्हाळी शिबिराचा समारोप
Margao
Margao Gomantak Digital Team

मडगाव सम्राट क्लब आयोजित 25 व्या उन्हाळी शिबिराचा समारोप सोहळा चौगुले महाविद्यालयाच्या सभागृहात उत्‍साहात पार पडला. याप्रसंगी मडगावचे समाजसेवक मायकल फर्न्स हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानाने मुलांमधील सर्जनशीलता नष्ट केली आहे, अशी खंत त्‍यांनी व्‍यक्त केली.

सदर शिबिरात मुलांसाठी 30 पेक्षा जास्त सर्जनशील कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते. बीपीएस स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष संतोष जॉर्ज सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. शिबिरात नुपूर नाईक, वेदिका देसाई, ऋतुजा नाईक, प्राची नाईक यांनी नृत्य, गायन, वक्तृत्‍व याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.

Margao
Goa Fest : ‘गोवा-फेस्ट’मुळे निर्मितीमूल्यांना प्रोत्साहन; मान्यवरांचा सहभाग

निमिशा च्यारी, किम्बर्ली फर्नांडिस यांनी चित्रकला, कला व हस्तकला, तसेच श्रवण, चेतन नाईक, देवराज देसाई, प्रत्युश केंकरे यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत मुलांना व्यस्त ठेवण्याचे काम केले. आंजेल व जयेश भगत यांनी फॅशन शो व वेशभूषेबद्दल माहिती दिली. अॅड शौमिक आंगले, स्मिता पै काकोडे यांनी नाटक, विश्र्वनाथ स्वार यांनी योग व सूर्यनमस्कार, साचिका आल्मेदा, नेशरील आल्वारीस यांनी वकृत्व कार्यशाळा घेतली.

Margao
US Capital Riot: ओथ कीपर्सचा संस्थापक स्टीवर्ट रोड्सला 18 वर्षांची शिक्षा, यूएस कॅपिटलवर हल्ला...!

पालकांतर्फे अॅड. बेऊलाह रॉड्रिगीस, श्रीमती सिंधु प्रभुदेसाई, इम्तियाज शेख, डॉ. क्रिल कायरो, डॉ. स्नेहा नाईक यांनी विचार मांडले. सम्राट क्लबचे अध्यक्ष विश्र्वनाथ स्वार यांनी स्वागत, नायश्री आल्वारीस यांनी सूत्रसंचालन तर डार्विन फर्नांडिस यांनी आभार मानले.

Margao
Sleeping Habits: काय सांगता? तोंड उघडं ठेवून झोपणं हा सुद्धा एक आजार! माहीत नसेल तर जाणून घ्या

विविध स्‍पर्धांतील विजेत्‍यांची नावे घोषित

शिबिरात विविध स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या. वकृत्व स्पर्धा : आरव गावकर, श्रीनिका शेणॉय, (सीनियर), प्रार्थना शानभाग, नाथन रॉड्रिगीस. गायन स्पर्धा : विधी नायक, श्र्लोक सूर्यवंशी (सीनियर), अनुराग नाबर, ब्रेवर्ली रॉड्रिगीस (ज्युनियर). शिबिरात सर्वोत्कृष्ट : पिनल डिसोझा, नाथन रॉड्रिगीस (ज्युनियर), श्रीनिका शेणॉय, ब्रेनवीन रॉड्रीगीस (सीनियर).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com