Tiatr Artist: गोव्याची 'परंपरा' राखायची असेल तर समर्पित नाट्यगृहे गरजेची, 'तियात्र' कलाकारांची जागेअभावी परवड

Margao Ravindra Bhavan Repair: आमची रंगभूमी, आमची कला, आमची संस्कृती ही आमचे पोट भरण्याची साधन आहे.‌ रंगभूमीसाठी त्याचमुळे हक्काचे एक वेगळे स्थान असायला हवे.
Tiatr
Tiatr artist goaDainik Gomantak
Published on
Updated on

आमची रंगभूमी, आमची कला, आमची संस्कृती ही आमचे पोट भरण्याची साधन आहे.‌ रंगभूमीसाठी त्याचमुळे हक्काचे एक वेगळे स्थान असायला हवे. रंगमंच ही 'परफॉर्मिंग आर्ट' (सादरीकरण कला)ला पाठबळ देणारी जागा आहे आणि ती फक्त ‘सादरीकरण कले’साठी समर्पित असायला हवी. 

आज गोव्यात जी अनेक नाट्यगृहे आहेत (उदाहरणार्थ वेगवेगळ्या शहरातील रवींद्र भवने) त्यात सरकारी कार्यक्रमच अधिक होत असतात. आमच्यासारख्या व्यावसायिक (तियात्र) कलाकारांना नाट्यगृहे मिळणे त्यामुळे अनेकदा दुरापास्त होते. त्यातच आता काही नाट्यगृहांचा वापर सिनेमा दाखवण्यासाठी केला जाणार आहे अशा बातम्या आहेत.

आधीच नाटकांच्या किंवा तियात्रांच्या प्रयोगांसाठी नाट्यगृहे मिळण्याची मारामार असताना नाट्यगृहांचे रूपांतर सिनेमागृहात करून नाटक-तियात्राला (किंवा इतर सादरीकरण कलेला) अधिकच अडचणीत टाकण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. 

एकंदरीत शासनाला नाटक-तियात्राचे फारसे पडलेले नाही असेच यावरून वाटते. तियात्र उद्योगाचे जर उदाहरण घेतल्यास अशी अनेक कुटुंबे आपल्याला दिसतील जी फक्त तियात्र सादरीकरणावर अवलंबून आहेत.

कोविड काळाने दिलेल्या आघातातून ही कुटुंबे आताच कुठे सावरत आहेत तर अशावेळी जिथे तियात्र सादर होत असते अशी महत्त्वाची नाट्यगृहे बंद राहणे त्यांना पुन्हा मारक ठरू शकेल. पणजी येथील कला अकादमीचे नाट्यगृह सुमारे तीन वर्षे बंद होते त्याचाही फटका तियात्र व्यवसायाला बसला आहे.

सिनेमा दाखवण्यासाठी किंवा इफ्फीसारखा महोत्सव आयोजित करण्यासाठी गोव्यात पुरेशी सिनेमागृहे आहेत.

Tiatr
Ravindra Bhavan: 'कला अकादमी'वर कोट्यवधी उधळले, अडचणींचा डोंगर तसाच राहिला; 'रवींद्र भवन'बाबतीत तसाच घाट घातला जातोय का?

या सिनेमागृहातूनच सिनेमा दाखवला जावा. सिनेमांचे आक्रमण नाट्यगृहांवर होता कामा नये. सिनेमा दाखवण्यासाठी नाट्यगृहांचे रूपांतर करण्याच्या निमित्ताने ज्या प्रकारे नाट्यगृह बंद ठेवण्याचा विचार चालू आहे तो देखील नाटक व्यवसायाच्या मुळावर येणारा आहे. 

काणकोण येथील नवीन रवींद्र भवनला ज्याप्रकारे पहिल्याच पावसात गळती लागली आहे ते पाहता किंवा सावर्डे येथील रवींद्र भवनची (वातानुकूल व्यवस्था बंद पडल्यामुळे) अवस्था पाहता या राज्यात सादरीकरण कलेला महत्त्व ते काय असाच प्रश्न उपस्थित होतो.

Tiatr
Tiatr Season: गोव्यात ईस्टरपासून सुरू होतोय 'तियात्रांचा' दुसरा हंगाम, तालमींना जोरात सुरुवात

वास्को येथील रवींद्र भवन तर अशाच कारणामुळे काही वर्षे बंद होते. या साऱ्या गोष्टी राज्याला शोभा देण्यासारख्या नाहीत. नाटक- तियात्र ही गोव्याची परंपरा आहे. ही जर परंपरा राखायची असेल तर त्यासाठी समर्पित नाट्यगृहे असणे ही काळाची गरज आहे. 

प्रिन्स जेकब - व्यावसायिक तियात्र कलाकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com