Margao: मडगावच्या रावणफोंड उड्डाणपुलावरील अवजड वाहतुकीचे निर्बंध अखेर उठवले; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

South Goa Heavy Traffic: मडगावच्या रावणफोंड येथील रेल्वे उड्डाणपुलाचा एक भाग खचला होता. तो आता पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर करण्यात आला
heavy vehicles allowed on Margao flyover
heavy vehicles allowed on Margao flyoverDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगावच्या रावणफोंड येथील रेल्वे उड्डाणपुलाचा एक भाग खचला होता. तो आता पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर करण्यात आला

आहे. यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध तात्काळ उठवावे, असा आदेश दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांनी दिला आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्रीनीत कोठावले यांनी आज हा आदेश जारी केला. रावणफोंड उड्डाणपुलावरून धावणाऱ्या अवजड वाहनांवरील आणि बसेसवरील बंदी आता उठवण्यात येणार आहे. ही सर्व वाहने आता पूर्वीप्रमाणेच रावणफोंड ते पॉवर हाऊस जंक्शन मार्गावर उड्डाणपुलावरून प्रवास करतील. या बाबत वाहतूक पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

heavy vehicles allowed on Margao flyover
Goa Traffic Congestion: धारगळची डोकेदुखी कधी थांबणार? 'दोन खांब' येथील वाहतूक कोंडीवर प्रशासन गप्प; दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा

गेल्या वर्षी, २१ मे २०२५ रोजी, मुसळधार पावसामुळे पुलाला जोडणारा रस्ता कोसळला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून, पुलाच्या एका बाजूची अवजड वाहतूक थांबवून वळवण्यात आली होती. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ८ जूनच्या अहवालात म्हटले आहे, पूल आणि रस्ता तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत झाला आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर मोटार वाहन कायद्यांतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला.

वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रस्त्यावरील तात्पुरते अडथळे आणि वळण मार्गाचे फलक हटवण्याचे निर्देश वाहतूक पोलिस आणि संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे मडगाव परिसरातील वाहनचालकांना आणि अवजड वाहनांना दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com