Vasco Drink And Drive Case: गोवा आणि रस्ते अपघात हे समीकरण काही नवीन नाही. मात्र या अपघातातील बरेचसे अपघात हे दारू पिऊन गाडी चालविल्याने होत आहेत हे वारंवार सिद्ध झालंय.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार वास्को येथे असाच एक ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा प्रकार घडलाय. पर्यटक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मद्यधुंद चालकाचे आपल्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार मद्यधुंद कार चालक त्याच्या ताब्यातील GA 06 T 5080 क्रमांकाची कार घेऊन जात असताना वास्कोजवळील सेंट अँड्र्यूज चर्च नजीक त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्या कारची धडक रस्त्यानजीक पार्क केलेल्या बाईकला बसली.
एवढे होऊन न थांबता ती कार सेंट अँड्र्यूज चर्चनजीकच्या रेस्टॉरंटमध्ये घुसली. रेस्टॉरंटमध्ये घुसताना कारची धडक रेस्टॉरंटच्या छताच्या खांबाला आणि शटर बसली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की खांब आणि शटर दोन्ही मोडून पडले. सुदैवाने आज रेस्टॉरंट बंद असल्याने जीवित हानी टाळली. मात्र यात रेस्टोरंट, दुचाकी यांचे बरेच नुकसान झाले. या घटनेचा पोलीस पंचनामा झाला की नाही हे अद्याप समजू शकले नाही.
तसेच आज दुसरा अपघात जुन्या सचिवालयाजवळ घडला. पणजीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील वळणावर महिला चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले व गाडी विभाजकावरून चढून विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर पोहचली.
समोरून येणाऱ्या टेम्पोचालकाने प्रसंगवधान राखून आपले वाहन बाजूला घेतल्याने अनर्थ टळला. हा अपघात आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडला.
दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढत असून हे अपघात रोखणे हे पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आव्हान बनलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.