

सासष्टी: मडगावातील पुरुमेंताचे फेस्त रविवार २४ मेपासून सुरू होत असून त्यासाठी जुना मार्केट, एसजीपीडीए मैदान आणि पार्किंग परिसरात दुकाने उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र फेस्त फेरीच्या भाडेपट्टीत करण्यात आलेल्या वाढीवरून आज दुकानदार आणि नगरपालिका प्रशासनामध्ये मतभेद निर्माण झाले. भाडेपट्टी वाढीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांत मोठा समस्या निर्माण झाली आहे. व्यवसाय कसा करावा, हा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.
फेस्त फेरीतील दुकानदारांनी मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांची भेट घेऊन भाडेवाढीबाबत जाब विचारला. वाढीव भाडेपट्टी लागू केल्यास दुकाने न थाटण्याची भूमिका दुकानदारांनी घेतली. गेल्या वर्षी भाडेवाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. गतवर्षी १० हजार ७०० रुपये भाडे भरले असून त्यापेक्षा अधिक रक्कम देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर नगरपालिकांकडून अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याचाही दावा त्यांनी केला.
यानंतर दुकानदारांनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचीही भेट घेतली. या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिल्याचे दुकानदारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्याधिकारी मधू नार्वेकर म्हणाले, प्रशासन खात्याच्या परिपत्रकानुसार फेस्त फेरीच्या भाड्यात दरवर्षी दहा टक्के वाढ करणे बंधनकारक आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये ८ हजारांवरून ९ हजार, २०२४-२५ मध्ये ९ हजारांवरून १० हजार आणि यंदा १० हजारांवरून ११ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. तसेच दुकानदारांना जास्तीत जास्त सात दिवस दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
४२ लाखांचा महसूल!
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले, फेस्त फेरीच्या तयारीसाठी महिनाभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वाढीव भाडेपट्टीबाबत माहिती देण्यात आली नव्हती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, पोलीस टॉवर, पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गतवर्षी फेस्त फेरीतून नगरपालिकेला ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदाच्या भाडेपट्टीचा प्रश्न सोडविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
४२ लाखांचा महसूल!
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले, फेस्त फेरीच्या तयारीसाठी महिनाभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वाढीव भाडेपट्टीबाबत माहिती देण्यात आली नव्हती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, पोलीस टॉवर, पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गतवर्षी फेस्त फेरीतून नगरपालिकेला ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदाच्या भाडेपट्टीचा प्रश्न सोडविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.