Goa News: ‘ती’ गहाळ फाईल शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर

मडगावातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील सासष्टी मामलेदार कचेरीतून मुंडकार प्रकरणाची फाईल गहाळ झाली आहे.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मडगावातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील सासष्टी मामलेदार कचेरीतून मुंडकार प्रकरणाची फाईल गहाळ झाली आहे. त्‍या फाईलचा शोध लागत नसल्याने शेवटी सासष्टीचे मामलतदार लक्ष्मीकांत देसाई यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गहाळ झालेल्‍या फाईलचा शोध सुरू असला तरी नेमकी तीच महत्त्‍वाची फाईल गहाळ कशी झाली हा सध्‍या चर्चेचा विषय झाला आहे. डिसेंबर 2021मध्ये घोगळ हाऊसिंग बोर्डमधील जॉन फ्रान्‍सिस डिसिल्वा यांनी माहिती अधिकार कायद्याखाली (आरटीआय) फाईल केज नंबर जेएम-I/एमयुएनडी/आरईजी/ बीईएन/629/78 याबाबत माहिती मागितली होती.

Goa News
Water Sports: बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी ‘क्यू’ प्रणालीची सक्ती- पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मात्र अजूनपर्यंत सदर माहिती न मिळाल्याने अर्जदाराने मडगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. त्यानंतर मामलेदारांनी ही फाईल मिळत नसल्याचे उपजिल्हाधिकारी कचेरीला कळविले.

अर्जदाराने जून 2022 मध्ये पणजी येथील गोवा राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतरही मामलेदार कचेरीतून फाईल मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

Goa News
Coal Transportation: 'डोम स्ट्रक्चर उभारल्याशिवाय कोळसा हाताळणी वाढवू देणार नाही'

11 नोव्हेंबर 2022 रोजी गोवा राज्य माहिती आयुक्तांनी मामलेदारांना फाईल शोधण्याचे आदेश दिले व मिळत नसल्यास पोलिसांत तक्रार करा असे स्पष्ट बजावले होते.

त्‍यानुसार मामलेदारांनी पोलिस तक्रार दाखल केली असून फाईल गहाळ झाल्याचे व न्यायालयातही ती उपलब्ध नसल्याचे म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com