Bike Theft: मडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 6 दुचाकी जप्त करत चोरांच्या टोळीचे मोडले कंबरडे; 3 भामट्यांना ठोकल्या बेड्या

Bike Lifters Gang Arrested Margao: मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली.
Bike Lifters Gang Arrested Margao
Bike Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) अंतर्गत नोंदवलेल्या स्कूटर चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद शेख, प्रसनजीत बर्मन आणि राजा हिरेमठ अशी असून हे तिघेही गोव्यातील विविध भागांत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले.

मडगाव (Margao) परिसरातून चोरीला गेलेल्या एका ॲक्टिव्हा स्कूटरचा शोध घेत असताना पोलिसांना या संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली असता चोरीच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला.

Bike Lifters Gang Arrested Margao
Goa Police Salary: '..त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी पगार मिळतो'! गोव्यातील हेड कॉन्स्टेबल्सनी दाखल केली याचिका; खंडपीठाकडून नोटीस

पोलिसांनी या टोळीकडून केवळ संबंधित प्रकरणातील ॲक्टिव्हाच नव्हे, तर अन्य पाच दुचाकीही जप्त केल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 6 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून या वाहनांची एकूण किंमत लाखांच्या घरात आहे. ही टोळी मुख्यत्वे गर्दीच्या ठिकाणी किंवा घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना लक्ष करत होती. जप्त केलेली वाहने त्यांनी गोव्यातील वेगवेगळ्या भागांतून चोरली असावीत, असा संशय पोलिसांना आहे. या टोळीच्या अटकेमुळे मडगाव आणि आसपासच्या परिसरातील दुचाकी चोरीच्या अनेक प्रकरणांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली. पोलीस आता या आरोपींनी ही वाहने कोणाला विकली होती किंवा ते या वाहनांचा वापर कोणत्या कामासाठी करणार होते, याचा अधिक तपास करत आहेत.

Bike Lifters Gang Arrested Margao
Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

ही यशस्वी कारवाई मडगावचे पोलीस निरीक्षक अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि देखरेख महत्त्वाची ठरली. मडगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई गुन्हेगारांवर वचक बसवणारी ठरली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.

Bike Lifters Gang Arrested Margao
Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या दुचाकी सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. मडगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com