Margao New Market: पदपथावरील विक्रेत्यांमुळे मडगाव न्यू मार्केटमधील व्यापारी त्रस्त

व्यवसायावर परिणाम
Margao New Market
Margao New MarketDainik Gomantak

Margao New Market: मडगाव शहरात पदपथावरील विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पूर्वी पदपथावर किंवा रस्त्याच्या बाजूला फळे, भाज्या, फुले वगैरे विकत असे. आता सर्व घरगुती उपकरणे, कपडे, सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य व इतर बऱ्याच वस्तू विकल्या जातात. त्यामुळे न्यू मार्केटमधील व्यावसायिकांना गिऱ्हाईक मिळेनासे झालेले आहे.

Margao New Market
Knee Implant: व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक पद्धतीने गुडघ्‍याचे यशस्‍वी रोपण; दक्षिणेतील पहिलाच प्रयोग

न्यू मार्केटमधील व्यापारी संघटनांनी नगरपालिका तसेच आमदारासमोर ही समस्या मांडूनही पदपथावरील विक्रेत्यांची संख्या घटण्याऐवजी वाढत चाललेली आहे. या चतुर्थीच्या काळात तर या व्यावसायिकांना बराच फटका बसला आहे. चतुर्थीच्या दिवसांत रस्त्यांवर गर्दी दिसत होती मात्र मार्केटमध्ये शुकशुकाट होती.

रस्त्यावरच सर्व गोष्टी मिळत असल्याने लोक मार्केटमध्ये येत नसल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने केली. हल्लीच माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनीही लोक मार्केटमध्ये येत नाहीत. वाहने पार्क करण्यासाठी मार्केट परिसरात पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, असे सांगितले होते. न्यू मार्केटमध्ये कचरा समस्या उद्‍भवत आहे. आग लागल्यास ती विझविण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही.

...तर दुकाने बंद करावी लागतील

न्यू मार्केटमधील पाच सहा दशकांपासून सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या एका महिला व्यवसायिकाने सांगितले की, यंदा आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. चतुर्थीसाठी महिलांना लागणाऱ्या सर्व वस्तू आम्ही आणल्या होत्या, पण गिऱ्हाईक नसल्याने नुकसानीला तोंड द्यावे लागले. अशी स्थिती यापूर्वी कधीच उद्‍भवली नव्हती. पण यंदा असे घडलेले आहे. यापुढे जर अशीच स्थिती राहिली तर आम्हाला दुकान बंद करावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

नगरपालिकेने आताच उपाययोजना केली नाही तर न्यू मार्केट मधील व्यापाऱ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे आणखी एका व्यापाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com