

मडगाव: नेसाय येथील गजबजलेल्या औद्योगिक वसाहतीमधील 'सेहत कॅनिंग' या मासळी पॅकिंगच्या कंपनीत आज दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच अचानक आगडोंब उसळला. त्यावेळी बेसावध असलेल्या कामगारांची पुरती तारांबळ उडाली.
आग विझविण्यासाठी प्रत्येकजण आपली शक्ती पणाला लावत होता. सुदैवाने या दुर्घटनेत अजिबात प्राणहानी झाली नाही. मात्र, अवध्या काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे या दुर्घटनेत करोडो रुपयांची मालमत्ता बेचिराख झाली.
आग लागल्याची ही भीषण दुर्घटना (शनिवारी) दुपारी कंपनीत काम सुरू असताना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविली.
अग्निशामक दलाचे अधिकारी गौल सौझा यांच्याशी संपर्क साधला असता, मासळी पॅकिंच्या कंपनीमध्ये दुपारी वेल्डींगचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक आगीची ठिणगी पेटल्याने ही आग लागली असावी, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या या आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच नुकसानीचा नेमका आकडाही समजू शकलेला नाही. मात्र, जीवितहानी झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आम्ही पुढील चौकशी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले,
अग्निशामक बंबालाही विलंब
या कंपनीत आग विझविण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते फ्रेडी त्रावासो यांनी भर औद्योगिक वसाहतीमधील या भीषण दुर्घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यातच नॅसाय येथील रेल्वे गेटजवळ उंची कमी केल्याने अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्यास विलंब झाला. त्यांना दुसऱ्या मार्गान वळसा घालून घटनास्थळी यावे लागले, असे त्रावासो यांनी सांगितले.
आग विझविणारी यंत्रणाच नाही
या कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी आग विझविण्यासाठी कुठलीही यंत्रणा येथे उपलब्ध नव्हती. त्यामुळे आग विझविण्यासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण केल्यावर त्यांनी आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.