
Audit Report Flags Financial Irregularities In Margao Municipality 2023-24
सासष्टी: लेखा संचालनालयाने मडगाव पालिकेच्या २०२३-२४ आर्थिक व्यवहाराचा ऑ़डिट अहवाल दिला असून त्यात आर्थिक त्रुटी दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवालात महसूल गळती, महसूल नुकसानी, वाढती कर थकबाकी यावर प्रकाश पाडण्यात आला आहे.
मडगाव पालिकेच्या (Margao Municipality) आर्थिक व्यवहाराचा जीआयएसने २०१८ ते २०२३ या सहा वर्षांचे सर्वेक्षण केले होते. मात्र नगरपालिकेने त्यांच्या सूचनांचे पालन न केल्याने नगरपालिकेला कमीत कमी २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जीआयएसच्या अहवालात सांगितल्या प्रमाणे ५४१० युनिट ऐवजी केवळ ४४४१ घरे घरपट्टी भरतात. त्याचप्रमाणे २३५८ औद्योगीक आस्थापना ऐवजी केवळ १६७१ आस्थापने व्यापारी कर भरतात. ऑडिट अहवालाप्रमाणे २०२३-२४ आर्थिक वर्षात ३६.८३ कोटी रुपयांच्या महसुलाची थकबाकी दाखवण्यात आली आहे.
नगरपालिकेने ३ जानेवारी २०२२ रोजी थकबाकी वसुली अधिकारी नियुक्त केला आहे. मात्र त्यापासून नगरपालिकेला मोठा फायदा झालेला नसून त्याला वसुली करण्यासाठी लक्ष्य देण्यात आलेले नाही. तसेच थकबाकी वसुलीचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे बंधन त्याच्यावर घालण्यात आलेले नाही असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नगरपालिकेने मार्केटमध्ये २०२३-२४ सालात सर्वेक्षण केले व त्यातून १४१ बेकायदेशीर आस्थापने कार्यरत असल्याचे दिसून आले. ऑडिट अहवालात एसजीपीडीए मार्केटचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. कचरा शुल्क संदर्भात जवळ जवळ ११२ कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोपो शुल्कातून सुद्धा वसुली बाकी असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.