Margao Municipality : पार्किंग जागेत ‘रेंट-अ-बाईक’चा धंदा

मडगावातील प्रकार : नगरसेवक आमोणकर यांची पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार
Amonkar
AmonkarDainik Gomantak

Margao Municipality : मडगाव पालिका इमारतीच्‍या आवारात दुचाकी उभ्‍या करून ‘रेंट-अ-बाईक’चा व्‍यवसाय करणाऱ्यांनी आता पालिकेच्‍या नियोजित बहुमजली पार्किग प्रकल्‍पाच्‍या जागेत दुचाकी उभ्‍या करून व्‍यवसाय करण्‍यास सुरुवात केली आहे. या प्रकाराला नगरसेवक महेश आमोणकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

पालिकेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांनी, आरटीओ तसेच अन्य संंबंधित अधिकारिणींना आवश्‍‍यक आदेश देऊन कारवाई करण्‍याची मागणी आमोणकर यांनी केली आहे. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या कडेही त्यांनी या संबंधी चर्चा केली आहे.

नगरसेवक आमोणकर यांनी मागील वर्षभरापासून सदर विषय लावून धरलेला आहे. पालिका मंडळाच्‍या बैठकीत यावर जोरदार चर्चा करण्‍यात आली होती. नंतर आटीओ तसेच वाहतूक पोलिस विभागाच्‍या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

‘रेंट अ बाईक’ व्‍यवसाय करण्‍यासाठी परवाना देताना त्‍यांना घर अथवा कार्यालयाच्‍या जागेत दुचाकी उभ्‍या करून व्‍यवसाय करण्‍याची अट घालण्‍यात येत असते.

Amonkar
Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात रस्ते अपघातात साडेचार वर्षांत 586 दुचाकीस्वारांचा मृत्यू ;मंत्री गुदिन्हो यांची माहिती

मात्र, अशा भाडेपट्टीवर देण्‍यात येणाऱ्या काळ्‍या व पिवळ्‍या नंबर प्‍लेटच्‍या दुचाकी पालिका इमारतीभोवती उभ्‍या करण्‍यात येत असल्‍याने पालिकेचे कर्मचारी, नगरसेवक तसेच पालिकेला भेट देणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. त्‍यामुळे बहुतेक नगरसेवकांनी संताप व्‍यक्‍त केला होता.

आरटीओकडून नंतर काही ‘रेंट अ बाईक’ व्‍यावसायिकांवर कारवाई झाल्‍यावर त्‍यांनी तेथून काढता पाय घेतला.

मात्र आता त्‍यांनी पालिकेच्‍या मागील बाजूस असलेली नियोजित बहुमजली पार्किंग प्रकल्‍पाची तसेच सभोवतालची जागा वापरून मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्‍या करून व्‍यवसाय सुरू केला आहे.

Amonkar
Goa Monsoon 2023 : डोंगरावरून एकाएकी चिखल, रेतीमिश्रीत पाणी नागरीवस्‍तीत

याबद्दल संताप व्‍यक्‍त करत नगरसेवक आमोणकर यांनी मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

पालिकेच्‍या जागेत बेकायदा दुचाकी उभ्‍या केल्‍या जात असताना कारवाई होत नसल्‍याने पालिकेच्‍या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.

चक्क खुर्च्या टाकून व्यवसाय !

सदर ‘रेंट अ बाईक’ व्‍यावसायिक पालिका इमारत व पॅसेज अडवून खुर्च्या टाकून व्‍यवसाय करत असल्‍याचे पाहून नगरसेवक आमोणकर संतापले व त्‍यांनी लगेच बाजार निरीक्षक सांतो फर्नांडिस तसेच पालिकेच्‍या सुरक्षा रक्षकाला सांगून सात आठ खुर्च्या व स्‍टूल जप्‍त करायला लावले.

या एकंदर बेकायदा बाबींत वाहतूक मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी लक्ष घालून ‘आरटीओ’ला कारवाई करण्‍यास भाग पाडावे, अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com