Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

Margao Municipal Council: कर्मचारी व इतरांच्या वेतनासाठी नगरपालिकेला महिन्याकाठी २.५ कोटी रुपये लागतात. जर थकबाकी वसुलीचे व्यवस्थित नियोजन केले तर लक्ष्य सहजसाध्य असल्याचे नार्वेकर यांचे म्हणणे आहे.
Margao Municipal Council Budget
Margao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव पालिकेची सध्या विविध माध्यमांतून तब्बल ३५ कोटी रुपये थकबाकी आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांनी थकबाकी वसुलीवर जास्त भर देण्याचे ठरविले असून पुढील सहा महिन्यांत १० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे.

नार्वेकर यांनी गेल्या महिन्यातच मुख्याधिकारी पदाचा ताबा घेतला आणि त्यांनी तात्काळ नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. कर्मचारी व इतरांच्या वेतनासाठी नगरपालिकेला महिन्याकाठी २.५ कोटी रुपये लागतात. जर थकबाकी वसुलीचे व्यवस्थित नियोजन केले तर लक्ष्य सहजसाध्य असल्याचे नार्वेकर यांचे म्हणणे आहे.

नगरपालिकेकडे जे व्यावसायिक वा व्यापारी व्यवस्थित महसूल भरत नाहीत, त्यांच्याशी संपर्क साधून वसुली करण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. वसुलीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी जे विशेष वसुली पथक आहे, त्याच्याशी नियमित संपर्क ठेवला जाईल तसेच त्यांच्याकडून अहवाल घेतला जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. थकबाकी वसुली मोहिमेसाठी नार्वेकर यांनी समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे.

Margao Municipal Council Budget
Mungul Margao: गँगवारने मडगाव हादरले! थरारक पाठलाग, कोयते, बाटल्‍यांनी हल्ला; दोघे गंभीर, गाडीवर गोळीबार

राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीत अडथळे

नगरपालिकेकडून यापूर्वी सुद्धा थकबाकी वसुली करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे जे उद्दिष्ट निश्र्चित करण्यात आले होते, ते साध्य झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. मडगाव मध्ये सुमारे ५० टक्के व्यापाऱ्यांकडे रितसर परवाना नसल्याचेही दिसून आले आहे.

Margao Municipal Council Budget
Margao: नंबर प्लेट नसणाऱ्या अन् 'मॉडीफाईड' सायलेन्सर असणाऱ्या दुचाकींवर मडगाव पोलिसांची कारवाई

पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांना नोटीस

पालिकेचे विशेष वसुली पथक प्रत्येक आठवड्याला २० लाख रुपयांची थकबाकी वसुली करणार आहे. वसुलीप्रमाणे नियोजनात बदल केले जातील. त्यामुळे सहा महिन्यांत १० कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. परवाना नसलेल्या व्यवसायांतून जी महसूल गळती होते, तीसुद्धा शोधून काढण्यात आली आहे. नगरपालिकेतील न्यू मार्केटमध्ये जी दुकाने दुसऱ्यांना भाड्याने देण्यात आली आहेत, त्यांची यादी तयार करण्यात आली असून संबंधितांना नोटीस बजाविण्यात येईल, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com