Mungul Margao: गँगवारने मडगाव हादरले! थरारक पाठलाग, कोयते, बाटल्‍यांनी हल्ला; दोघे गंभीर, गाडीवर गोळीबार

Mungul Margao Gang War: आत्तापर्यंत अन्‍वर गँग, कुलाल गँग, वॅली गँग, वॉल्‍टर गँग अशा विविध गँगमधील आपापसातील युद्धामुळे मडगाव कित्‍येकदा हादरून गेले आहे. मागचा काही काळ मडगाव परिसर गँगवॉरपासून मुक्‍त होता.
Mungul Margao Gang War
Mungul Margao Gang WarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आत्तापर्यंत अन्‍वर गँग, कुलाल गँग, वॅली गँग, वॉल्‍टर गँग अशा विविध गँगमधील आपापसातील युद्धामुळे मडगाव कित्‍येकदा हादरून गेले आहे. मागचा काही काळ मडगाव परिसर गँगवॉरपासून मुक्‍त होता. मात्र मंगळवारी पहाटे पुन्‍हा एकदा मडगावातील मुंगूल परिसरात गँगवॉरचा उद्रेक झाला.

रफीक तशान (२४) आणि युवकेश सिंग (२०) हे दोघे खुनी हल्‍ल्‍यात गंभीर जखमी झाले असून त्‍यांना गोमेकॉत हलविण्‍यात आले आहे. दरम्‍यान, हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबारही केला.

पहाटे पावणेतीनच्‍या सुमारास चार गाड्यांनी एका कारचा थरारक पाठलाग केला आणि वरील दोघांवर खुनी हल्ला चढविण्‍यात आला. या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी अक्षय तलवार, राहुल तलवार (दोघेही रा. बड्डे-मडगाव), विल्‍सन कार्व्हालो, शाहरुख (रा. दवर्ली) व रसूल या पाचजणांविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती.

शिवाय आणखी सुमारे १५ अज्ञात संशयितांविरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. कोयते आणि सोडा-वॉटरच्‍या बाटल्‍यांनी हा हल्‍ला करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, जखमी झालेले दोघेही युवक वॉल्‍टर गँगशी संबंधित आहेत. काल सोमवारी रात्री ते कोलवा भागातील एका हॉटेलमध्‍ये पार्टीला गेले होते. त्‍यावेळी हल्‍लेखोर त्‍यांच्‍यावर पाळत ठेवून होते. पहाटेच्‍यावेळी ते दोघेही आपल्‍या ‘बोलेनो’ गाडीने बाहेर पडले असता हल्‍लेखोरांनी चार गाड्यांतून त्‍यांचा पाठलाग केला. मुंगूल येथे हॉटेल ‘शगून’जवळ हल्‍लेखोरांनी आपल्‍या चारही गाड्यांनी त्‍या दोन युवकांच्‍या गाडीला गराडा घातला आणि हल्ला चढविला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, हल्लेखोरांनी आपल्‍या तोंडावर बुरखा घातला होता. त्‍यांनी रफीक व युवकेशवर सोडा बॉटल आणि कोयत्‍यांनी हल्‍ला चढविला. यातील एका बुरखाधारी संशयिताने दोनदा गोळीबार केला. मात्र या गोळ्‍या गाडीच्‍या काचेला लागून काच फुटली. त्‍यानंतर हल्‍ला करणारे घटनास्‍थळाहून पळून गेले. गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एकूण १५ ते २० हल्‍लेखोरांनी हा हल्‍ला केला असावा अशी माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत तिघा संशयितांना ताब्‍यात घेतले आहे. तसेच दोन गाड्या जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत. नुकसानग्रस्‍त गाडी कोलवा पोलिस स्‍थानकासमोर नेऊन ठेवली असून फॉरेन्‍सिक विभागाकडून त्‍या गाडीची तपासणी केली जात आहे.

तुरुंगातील मारहाणीचा वचपा काढण्‍यासाठी हल्‍ला?

हा हल्‍ला नेमका कोणत्‍या कारणामुळे झाला हे स्‍पष्‍ट झाले नसले तरी या हल्‍ल्‍यात जखमी झालेला युवकेश याचीही पार्श्वभूमी गुन्‍हेगारीची स्‍वरूपाची आहे. एका प्रकरणात अटक झाल्‍याने त्‍याला कोलवाळ तुरुंगात ठेवण्‍यात आले होते. तेथेही त्‍याने काहीजणांवर हल्‍ला केला होता. त्‍याचा वचपा काढण्‍यासाठीच हा हल्‍ला झाला असावा असा अंदाज व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

हल्‍लेखोरांना ‘रासुका’ लावा : विजय सरदेसाई

गोव्‍यात कायदा व सुव्‍यवस्‍थेवर गंभीर प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक नाही हेच यातून सिद्ध होते. अशा गुंडांवर ‘रासुका’ लावून त्‍यांना अटक करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. या गुंडांकडे परवाना नसलेल्‍या बंदुका येतात कुठून? काही दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याच्‍या वडिलांवर सोपो घेणाऱ्या बाऊन्‍सरने मडगावात हल्‍ला केला होता. त्‍या बाऊन्‍सरला अजूनही अटक झालेली नाही. पोलिसांच्‍या आप्‍तावर हल्‍ला करणाऱ्यांना अटक होत नाही तर सामान्‍य नागरिकांची काय बाब, असेही ते म्‍हणाले.

Mungul Margao Gang War
Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

अन्‍वरवर झाला होता भरदिवसा गोळीबार

मुंगूल-फातोर्डा येथील आजच्‍या गोळीबाराच्‍या घटनेने काही वर्षांपूर्वी अशाच टोळीयुद्धातून आर्लेम सर्कलजवळ अन्‍वर शेख या गुंडावर वॅली गँगच्‍या गुंडांनी हातात नंग्‍या तलवारी घेऊन पाठलाग करत केलेल्‍या हल्‍ल्‍याची आठवण झाली. त्‍यावेळी त्‍यातील एकाने अन्‍वरवर गोळीबार केला होता. ही गोळी अन्‍वरच्‍या जांघेला लागल्‍याने तो जखमी झाला होता. त्‍यानंतर कोंब-मडगाव येथे एका हॉटेलच्‍या वादातून हॉटेलमालकावर गोळीबार करण्‍यात आला होता.

Mungul Margao Gang War
Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

आणखी काही रडारवर; कसून शोध सुरू

रात्री उशिरा मिळालेल्‍या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी आत्तापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. मात्र त्‍यांची नावे उघड केलेली नाहीत. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्‍याची शक्‍यता आहे. फरारी हल्लेखोरांच्‍या मागावर पोलिस आहेत. लवकरच त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या जातील असा विश्‍‍वास पोलिसांनी व्‍यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com