Margao: 'लग्न नको'! मडगावातील मुलगी सापडली कोल्हापूरात; विवाहाच्या तगाद्यामुळे घरातून काढला पळ

Margao Kidnapping Case: मागच्या शुक्रवारी ११ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आईच्या अकाली निधनानंतर घरच्या लोकांनी सातत्याने  लवकर  विवाह करण्यासाठी तगादा लावल्याने कंटाळून त्या १७ वर्षीय अल्पवयीन  मुलीने स्वतःहून घर सोडून पळ काढला होता. मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतिडोंगर येथून अपहृत  झालेल्या त्या मुलीला पोलिसांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून शोधून काढून आणले असता तिने आपली दर्दभरी कहाणी पोलिसांना सांगितल्यानंतर, पोलिसही काही मिनिटे चक्रावून गेले.

तिला मडगावात आणल्यानंतर तिची  बिगर सामाजिक संस्थेसमोर  जबानी नोंदवून घेतली. यावेळीही  तिने  आपल्यावर सतत घरच्या लोकांकडून दबाव येत असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगितले. नंतर तिला समजावून सांगून पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

 मागच्या शुक्रवारी ११ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  त्या मुलीचे  अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार मडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. पीडितेच्या  वडिलांनी यासंबंधी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती . अज्ञाताने आपल्या मुलीची अपहरण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले होते. अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

Crime News
Margao Kidnapping Case: मोतीडोंगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण! पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे; तपासकामाला वेग

असा लावला पोलिसांनी शोध...

पोलिसांना  दिलेल्या माहितीनुसार,  ती मुलगी बसमधून मडगावहून  कोल्हापूरला  गेली होती.  तिने एका युवकाला आपण कोल्हापूरला येत असल्याचे सांगितले होते. मडगाव पोलिसांनी एक पोलिस पथक तेथे पाठवून  दिले होते.

Crime News
Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

त्या पोलिस पथकांनी दोघांनाही ताब्यात घेऊन नंतर गोव्यात आणले. चौकशीत त्या मुलीने आपण स्वखुशीने पळून गेले होते, त्यात त्या युवकाचा सहभाग नसल्याचे सांगितले. तपासाअंती त्यात तथ्य आढळून आल्यानंतर त्या युवकाला पोलिसांनी सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com