

सासष्टी: गेल्या चार वर्षांपासून मडगावच्या मास्टर प्लॅन २०४१ ची चर्चा जोरात चालू आहे. मध्यंतरी या मास्टर प्लॅनवरून मोठे वादळ उठले होते. मात्र अजून हा मास्टर प्लॅन का जाहीर झाला नाही. हा मास्टर प्लॅन नेमका कुठे अडकला, असा सवाल फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
हा मास्टर प्लॅन तयार करताना लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्र्वासात घेतलेले नाही. जोपर्यंत हा मास्टर प्लॅन लोकप्रतिनिधींना व नागरिकांना दाखवला जात नाही, तो पर्यंत आपण गप्प बसणार नाही, आपण सतत याबद्दल सरकारवर दबाव टाकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या या ‘मास्टर प्लॅन’ बद्दल गुप्तता पाळण्यात येत आहे. याचा अर्थ या ‘मास्टर प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपलेल्या आहेत, ज्या अधून मधून उफाळून वर येतात. मडगाव पालिका बागेतील दोन मजली इमारतीचा प्रस्तावही त्यातील एक गुप्त गोष्ट असावी, अशी शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री विकसित गोवा २०३७ ची गोष्ट बोलतात व मडगावच्या हा ‘मास्टर प्लॅन’ २०४१ चा आहे. यामुळे घोळ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आपण मडगाव पालिकेचा फातोर्ड्याचा आमदार या नात्याने एक घटक आहे, पण आपल्यालाच या ‘मास्टर प्लॅन’ संदर्भात अंधारात ठेवले आहे. त्यांमुळे या प्लॅनबद्दल आपण लोकांना काय सांगू, असा प्रश्नही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. आमच्या शेजारी मतदारसंघातील आमदारांनी मास्टर प्लॅन संदर्भात संबंधीताचा सल्ला किंवा सूचना घेण्याची गरज नाही असे म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्याबद्दल आपल्याला आश्र्चर्य वाटते, असेही सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.