
मडगाव: मडगावचा मास्टर प्लॅन हा एका मास्टरने त्याच्या राजकीय निवृत्ती पॅकेजसाठी केलेली भविष्यातील तरतूद आहे, असा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज मडगाव ‘जनता दरबार’मध्ये केला.
मडगावकरांसाठी लोकांचा प्लॅन आम्ही राबविण्यासाठी आता या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांची मते जाणून घेऊ असे स्पष्ट केले. तसेच नाव न घेता आमदार कामतांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आम्ही या लोकांना सक्षम पर्याय देऊ, असेही त्यांनी म्हणताना, पुढील राजकीय नांदीचे संकेतही दिले. शेतकऱ्यांच्या कवडीमोलाने संपादित केलेल्या जमिनीचा हा सौदा आहे. हा मास्टर प्लॅन मडगावात फिरून नव्हे, तर मुंबईत बसून बनविलेला आहे.
त्याला पर्याय म्हणून आम्ही लोकांचा प्लॅन तयार करणार, त्यासाठी जनजागृती केली जाईल. ऐतिहासिक लोहिया मैदानावर आम्ही पुढील कृती जनतेसमोर मांडू, असे सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, काँग्रेससोबत आम्ही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत २०२७ पर्यंत युती झाली होती. ती आम्ही पाळत आहे, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत.आमचे काँग्रेसशी वैमनस्य नाही. कुडचडेत आमचा व काँग्रेसचा एकाच दिवशी कार्यक्रम झाला, अमित पाटकरांनी जरा आधी सांगितले असते तर मी माझा कार्यक्रम पुढे ढकलला असता, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.